Akash Ambani Viral Video (फोटो- ट्विटर)
मुंबई इंडियन्सचा चेन्नईने केला दारुण पराभव
एमआयचे मालक आकाश अंबानी यांचा व्हिडिओ व्हायरल
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह
Akash Ambani Video Viral: काल आयपीएलच्या हंगामातील सर्वात मोठा महामुकाबला वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा दारुण पराभव झाला आहे. 2026 मध्ये प्ले ऑफ मध्ये जाण्याची शक्यता कमी होत चालली आहे. दरम्यान कालचा सामना हातातून गेला असे समजताच मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी यांनी स्टेडियम सोडले. याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईचा पुन्हा एकदा लाजिरवाणा पराभव झाला आणि या पराभवानंतर चक्क आकाश अंबानींचा संयम सुटल्याचे पाहायला मिळाले. सामना संपण्याआधीच संतापलेले आकाश अंबानी डगआउट सोडून मैदानाबाहेर निघून गेल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या घटनेमुळे आता मुंबई इंडियन्सच्या गोटात सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
Akash Ambani left the stadium in mid match 🤯 & asked to fans leaves as well. He is very disappointed to MI performance. Captaincy changes & big decision loading in mid season. pic.twitter.com/B74wJUUAD7 — VIKAS (@Vikas662005) April 24, 2026
मुंबई इंडियन्सचा मागील सामना एका निर्णायक वळणावर असताना हार्दिक सेनेने एकामागून एक चुका केल्या. खराब गोलंदाजीमुळे चेन्नईच्या संघाने 200 पेक्षा जास्त रन्स केल्या. त्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स केवळ 103 रन्स करू शकली. मुंबईचा पराभव होताना दिसत होता. त्यामुळे आकाश अंबानी प्रचंड अस्वस्थ दिसत होते. काही क्षणातच त्यांनी आपली जागा सोडली आणि सामना पूर्ण होण्याची वाट न पाहता ते तडकाफडकी मैदानाबाहेर निघून गेले.
प्रेक्षकांकडे पाहून ‘ती’ कृती आणि संताप
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असेही दिसत आहे की, मैदानाबाहेर जात असताना आकाश अंबानींनी प्रेक्षकांकडे पाहून काहीतरी सूचक खुणा केल्या. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहता, ते संघाच्या कामगिरीवर आणि मैदानातील बेशिस्त खेळावर प्रचंड नाराज असल्याचे स्पष्ट जाणवत होते.
GT Vs RCB Pitch Report: गुजरात अन् बंगलोरला खुणावतेय ‘ते’ स्थान; एम. चिन्नास्वामीवर कोण मारणार बाजी?
हार्दिक पंड्याचे कर्णधार पद जाणार?
गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सचे कर्णधार पद रोहित शर्माकडून काढून हार्दिक पंड्याकडे देण्यात आले तेव्हापासून मुंबई इंडियन्सचे चाहते देखील प्रचंड नाराज झाले आहेत. मागच्या वर्षी हार्दिकला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला. यंदा देखील मुंबई चांगली कामगिरी करत नाहीये. रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याकडे नेतृत्व सोपवल्यापासून मुंबई इंडियन्समध्ये अंतर्गत वाद सुरू असल्याच्या चर्चा आधीच होत्या. आता आकाश अंबानींची ही जाहीर नाराजी हार्दिकच्या अडचणीत वाढ करू शकते.






