SA vs NZ : लाहोरमध्ये सेमी फायनलचा थरार! न्यूझीलंडचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय; पहा दोन्ही संघांचे प्लेइंग-11
SA vs NZ : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा दुसऱ्या सेमी फायनल सामना आज (5 मार्च) लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर खेळवला जात आहे. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड हे संघ आमनेसामने उभे ठाकणार आहेत. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात विजयी संघ रविवारी (9 मार्च) भारताविरुद्ध अंतिम सामना खेळेल. 5 मार्चला दुबईत पार पडलेलया पहिल्या सेमी फायनल सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सने विजय प्राप्त केला आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी आनंदाची बातमी म्हणजे एडन मार्कराम तंदुरुस्त आहे. तसेच कर्णधार टेम्बा बावुमा आणि टोनी डी झॉर्झी हेही सावरले आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीचा सामना सुरू झाला आहे. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात सेमी फायनलचा सामना लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर खेळवला जात आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीसी एकदिवसीय स्पर्धांच्या बाद फेरीच्या सामन्यांबाबत विचार करता न्यूझीलंड नेहमी वरचढ ठरत आला आहे. त्या तुलनेत दक्षिण आफ्रिकेचा संघ कच खाताना दिसून आला आहे.
या सामन्यात ज्याने बाजी मारली तो संघ 9 मार्चला दुबईत होणाऱ्या अंतिम सामन्यात भारतासोबत भिडणार आहे. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक असणार आहेत.
हेही वाचा : IND vs AUS : अय्यरचा मिसाईल थ्रो पाहिलात का? अॅलेक्स कॅरीला काही कळण्याआधीच क्षणात खेळ उध्वस्त..; पहा Video
न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हे दोन संघ आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीत दोनदा आमनेसामने उभे ठाकले आहेत. आले आहेत. यामध्ये न्यूझीलंडने 2011 च्या उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण आफ्रिकेचा 49 धावांनी पराभव केला होता. तसेच 2015 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात देखील न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला सहा विकेट्सने पराभूत केले होते. त्यामुळे या सामन्यातही न्यूझीलंडचे पारडे जड मानले जात आहे.
हेही वाचा : IND Vs AUS Semi Final: अखेर 2023 चा वचपा काढलाच; ‘कांगारूं’ना नमवत भारताची फायनलमध्ये शानदार धडक
रायन रिकेल्टन, टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, एडन मार्कराम, विआन मुल्डर, मार्को जॉन्सन, केशव महाराज, केशवजी महाराज, एन.
विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (क), मॅट हेन्री, काइल जेमिसन, विलियम ओ’.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 मार्चला सेमीफायनलचा सामना पार पडला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर विजय प्राप्त केला आहे. या विजयाने भारत थेट फायनलमध्ये पोहचला आहे. भारताने ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सने विजय प्राप्त केला आहे. विराट कोहलीने केलेली 84 धावांची खेळी महत्वाची ठरली. ऑस्ट्रेलियाने भारताला 265 धावांचे लक्ष्य दिले होते.