यूएई : आशिया कप स्पर्धा २०२२ (Asia Cup) मध्ये काल शुक्रवारी पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग (Pakistan Vs Hongkong) या दोन संघात क्रिकेटचा सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तान संघाने दमदार कामगिरी करून हाँगकाँग संघावर तब्बल १५५ धावांनी विजय मिळवला. या मोठया विजयानंतर पाकिस्तानने ‘अ’ गटातून भारता पाठोपाठ सुपर ४ मध्ये एंट्री मिळवली आहे.
पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग सामन्यात सर्वात आधी हाँगकाँगने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. पाकिस्तानला कमी धावांत रोखून निर्धारीत लक्ष गाठण्याचा त्यांचा डाव होता. परंतु पाकिस्तानच्या रिझवान आणि फखर जमान यांनी दमदार अर्धशतकं ठोकत अनुक्रमे ७८ आणि ५३ धावा केल्या. खुशदील याने ३५ धावा ठोकत फिनीशिंग टच दिला. अशाप्रकारे पाकिस्तान संघाने हाँगकाँग संघाला केवळ २ विकेट देऊन २० षटकात १९३ धावा केल्या. ज्यानंतर हाँगकाँगचा संघ फलंदाजीला आला असता पाकिस्तानच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत हाँगकाँगच्या एकाही फलंदाजाला साधी दुहेरी आकडेवारीही गाठू दिली नाही. त्यामुळे अवघ्या १०. ४ षटकात हाँगकाँग ३८ धावांवर सर्वबाद झाला. ज्यामुळे पाकिस्तान १५५ धावांनी विजय मिळवत इतिहास रचला.