दुबई : आशिया कप २०२२ (Asia Cup) स्पर्धेतील अंतिम सामना आज पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका (Pakistan Vs ShriLanka) असा रंगणार आहे. यंदाच्या आशिया कप स्पर्धेच्या विजेतेपदी कोणता संघ विराजमान होणार याची उत्सुकता सर्वच क्रिकेट चाहत्यांना लागली असून दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आजचा सामना पारपडणार आहे. सुपर ४ च्या अंतिम लढतीत श्रीलंकेने पाकिस्तानवर ५ विकेट्सने विजय मिळवला होता. तेव्हा आता अंतिम सामन्यात दोन्ही संघ नेमके खेळाडू घेऊन उतरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आशिया कप स्पर्धेला २७ ऑगस्ट पासून सुरुवात करण्यात आली होती. तर स्पर्धेचा दुसरा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तान या दोन संघांमध्ये खेळवण्यात आला. पाकिस्तानने भारतासोबत पहिला सामना हरला असला तरी त्यानंतर पाकिस्तान संघाची आशिया कप मधील कामगिरी ही प्रशंसनीय ठरली.
भारतापाठोपाठ सुपर ४ राउंड मध्ये स्थान मिळवत पाकिस्तानने सुपर ४ च्या पहिल्या सामन्यात भारताला हरवत मोठा विजय मिळवला. त्यानंतर लागोपाठ अजून एक सामना जिंकत स्पर्धेतील अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले. आशिया कप २०२२ चे यजमान पद भूषविणाऱ्या श्रीलंका संघाची कामगिरी देखील स्पर्धेत तितकीच उल्लेखनीय ठरली. यास्पर्धेत श्रीलंकेने सुरुवातीपासून आपला फॉर्म कायम ठेवत सुपर ४ राउंड मध्येही तीनही सामने जिंकत अंतिम सामान्यांपर्यंत पर्यंत मजल मारली आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका हे दोन्ही बलाढय संघ एकमेकांसमोर आल्याने अंतिम सामना रंगतदार होईल यात शंकाच नाही.
अशी असेल संघांची संभाव्य प्लेयिंग ११ :
पाकिस्तान संघ :
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, खुशदिल शाह, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद हसनैन, हारिस रौफ, शाहनवाज दहानी
श्रीलंका संघ:
दसुन शनाका (कर्णधार), दनुष्का गुणथिलका, पथुम निसंका, कुसल मेंडिस, चरित असलंका, भानुका राजपक्षे, दिलशान मदुशंका, धनंजया डी सिल्वा, वानंदु हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश तीक्ष्णा.
कुठे पहाल अंतिम सामना :
आशिया कप मधील अंतिम सामना हा सायंकाळी ७: ३० वाजता सुरु होणार आहे. हा सामना स्टार स्पोर्ट्सवर, डीडी स्पोर्ट्स पहायला मिळेल. तसेच याचे लाईव्ह टेलिकास्ट डिझनी हॉटस्टारवर पाहू शकता.