एम एस धोनी आणि पॅट कमिन्स(फोटो-सोशल मीडिया)
IPL 2025 : काल म्हणजे गुरुवारी (दि. 27 मार्च) लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने 5 विकेट्सने विजय मिळवला होता. या सामन्यात हैदराबादने जरी सामना गामवाला असला तरी कर्णधार पॅट कमिन्सने एक इतिहास रचला आहे. तसेच त्याने इतिहास रचत एमएस धोनीच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.
गुरुवारी झालेल्या लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात फलंदाजीसाठी आलेला हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स याने पहिल्या तीन चेंडूंवर तीन लांबलचक षटकार मारले. हे करून त्याने इतिहास रचला आहे. त्यासोबत त्याने एमएस धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केलीय आहे.
पॅट कमिन्स फलंदाजीला मैदनात आला तेव्हा 18 वे षटक सुरू होते. समोर गोलंदाज शार्दुल ठाकूर होता. जो हैदराबादच्या फलंदाजांवर नियंत्रण ठेवून होता आणि नंतर तो सामनावीर देखील ठरला. ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर कमिन्सला पहिला स्ट्राईक मिळाला. त्याने पहिला चेंडू ओव्हर पॉइंटवर मारला. तो चेंडू लांब सीमारेषेबाहेर गेला. पुढचा चेंडू ऑफसाईडवर फुल टॉस म्हणून आला तेव्हा कमिन्सने त्यावर पुन्हा गगनचुंबी षटकार मारला.
हेही वाचा : IPL 2025 : आयपीएल म्हणजे सर्व काही शक्य..! केवळ ५ सामन्यांत चौकार, षटकार अन् २०० प्लसचे मोडले रेकॉर्ड…
यानंतर पॅट कमिन्स १८व्या षटकातील तिसरा चेंडू खेळला. यावेळी समोर गोलंदाज आवेश खान होता. त्यानंतर कमिन्सने चेंडू जोरदार टोलवला. पॅट कमिन्सने पहिल्या तीन चेंडूंमध्ये सलग तिसरा षटकार ठोकण्याचा पराक्रम केला. मात्र, पुढच्याच चेंडूवर कमिन्स आवेश खानची शिकार ठरला. अशा प्रकारे त्याने 4 चेंडूंच्या छोट्या खेळीत 18 धावा चोपल्या. आयपीएलच्या इतिहासात कमिन्सच्या पूर्वी देखील तीन फलंदाजांनी क्रिजवर येताच सलग तीन षटकार लगावण्याचा पराक्रम केला होता.
हा पराक्रम करण्यात केकेआरच्या सुनील नरेन प्रथम येतो. त्याने 2021 मध्ये RCB विरुद्ध क्रिजवर येताच लागोपाठ तीन षटकार खेचले होते. त्यानंतर 2023 मध्ये हैदराबादच्या निकोलस पूरनने लखनौविरुद्ध पहिल्या तीन चेंडूत तीन षटकार लगावत सगळ्यांना धक्का दिला होता. या क्लबमध्ये सामील होणारा तिसरा फलंदाज ठरला तो म्हणजे चेन्नई सुपर किंग्जचा महेंद्रसिंग धोनी. गेल्या मोसमात त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध 4 चेंडूत 20 धावा कुटल्या होत्या. ज्यामध्ये त्याने पहिल्या तीन चेंडूत 3 षटकार ठोकले होते. आता या यादीत पॅट कमिन्सचा देवखील समावेश झाला आहे.
हेही वाचा : IPL 2025 : ‘…त्यासाठी गोलंदाजांना मानसिक उपचारांची गरज’; रवीचंद्रन अश्विन असं का म्हणाला? वाचा सविस्तर…
काल गुरुवार (27 मार्च) रोजी लखनौविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघाने 20 षटकात 9 विकेट गमावून 190 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल लखनौ संघाने 23 चेंडू बाकी ठेवत आणि 5 गडी गमावून लक्ष्य पार केले. शार्दुल ठाकूरच्या घातक गोलंदाजीमुळे हैदराबाद संघाला 190 धावांपर्यंतच मजल मारता आली. लखनौकडून सामन्यात 4 बळी घेणारा शार्दुल ठाकूर सामनावीर पुरस्कारचा मानकरी ठरला.