फोटो सौजन्य - Punjab Kings/KolkataKnightRiders सोशल मीडिया
Punjab Kings vs Kolkata Knight Riders Toss Update : आज अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर आमनेसामने असणार आहे. पंजाब किंग विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. हा आयपीएल २०२५ चा ३१ वा सामना नवीन पीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मागील दोन पराभवानंतर पंजाब किंग्सला आज या स्पर्धेमध्ये कमबॅक करण्याची संधी आहे. तर कोलकाता नाईट राइडर्सचा संघ त्यांचा सलग दुसरा विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल.
वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनला गेल्या सामन्यात दुखापत झाली होती, त्यामुळे तो या स्पर्धेमधून बाहेर जावे लागले आहे. आज कोलकाता नाईट राइडर्सने मोईन अलीला संघाबाहेर बसवले आहे. त्याच्या जागेवर अँरिक नॉर्टजेला संघामध्ये स्थान मिळाले आहे. पंजाब किंग्सच्या संघामध्ये आज झेवियर बार्टलेट प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळाले आहे.
🚨 Toss 🚨@PunjabKingsIPL won the toss and opted to bat first against @KKRiders.
Updates ▶️ https://t.co/sZtJIQpcbx#TATAIPL | #PBKSvKKR pic.twitter.com/ZkwM17fknM
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2025
मागील दोन्ही सामन्यांमध्ये श्रेयस अय्यरच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पंजाबचे आतापर्यत ५ सामने झाले आहेत यामध्ये यांनी ३ सामने जिंकले आहेत तर दोन सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. कोलकाता नाईट राइडर्सचा संघ या स्पर्धेमध्ये चढ उताराचा राहिला आहे. मागील सामन्यांमध्ये केकेआरने चेन्नईचा मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. पंजाब किंग्सचा संघ सध्या गुणतालिकेमध्ये सहाव्या स्थानावर आहे, तर कोलकाताच्या संघ स्पर्धेत सध्या ६ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.
आजच्या सामन्यांमध्ये श्रेयस अय्यरवर चाहत्यांची नजर असणार आहे. सध्या श्रेयस दमदार फॉर्ममध्ये आहे त्याचबरोबर संघाचा युवा सलामीवीर फलंदाज प्रियांश आर्यने संघासाठी शतक झळकावले आहे. त्याचबरोबर कोलकाताच्या फलंदाजीचे सांगायचे झाले तर सुनील नारायण त्याचरोबर संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे दमदार फॉर्ममध्ये आहेत. गोलंदाजीमध्ये पंजाबकडे चहल आणि अर्शदीप यांच्याकडे चाहत्यांच्या नजारा खिळल्या आहेत, त्याचबरोबर कोलकाताचे वरुण चक्रवर्ती आणि सुनील नारायणने अनेक मोठ्या फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकिपर), श्रेयस अय्यर (कॅप्टन), नेहल वधेरा, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिश, शशांक सिंग, मार्को जॉन्सन, झेवियर बार्टलेट, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल.
क्विंटन डी क्वाक (विकेटकिपर), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, हर्षित राणा, अँरिक नॉर्टजे, वैभव अरोडा, वरून चक्रवर्ती