फोटो सौजन्य : IndianPremierLeague
पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स : पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये सामना सुरू आहे. अहमदाबाद येथे मुसळधार पावसानंतर उशिरा सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यात श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दोन्ही संघाचा आजचा सामना हा फारच महत्त्वाचा असणार आहे. आज जो संघ विजयी होईल तो संघ फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने पहिले फलंदाजी करत 204 लक्ष्य उभे केले आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी कमालीची कामगिरी केली. आजच्या सामन्यांमध्ये पहिला डावात खेळाडूंची कामगिरी कशी झाली या संदर्भात सविस्तर जाणून घ्या.
मुंबई इंडियन्सच्या फलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर रोहित शर्मा हा आज स्वस्तात बाद झाला त्याने 7 चेंडू खेळल्याने 8 धावा करून विकेट गमावली. त्यानंतर जॉनी बेयरस्टो याने आणखी एकदा महत्वाच्या धावा केल्या. त्याने 24 चेंडूंमध्ये 38 धावा केला यामध्ये त्यांनी दोन षटकार आणि तीन चौकार मारले. टिळक वर्मा आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी कमालीची खेळी खेळली. तिलक वर्मा याने 29 चेंडूंमध्ये 44 धावा केल्या. यामध्ये दोन षटकांचा देखील समावेश आहे त्याचबरोबर दोन चौकार देखील मारले.
PBKS VS MI : पावसामुळे सामन्यात अडथळा! मॅच सुरू व्हायला होणार उशीर…वाचा Update
सूर्यकुमार यादव यांनी आणखी एकदा प्रभावशाली खेळी खेळले त्याने 26 चेंडूंमध्ये 44 धावा केल्या यात त्याने तीन षटकार आणि चार चौकार मारले. हार्दिक पंड्या आज 13 चेंडूमध्ये 15 धावा केल्या आणि एक चौकार मारला. मुंबई इंडियन्ससाठी आजच्या सामन्यात नमन धीर याने 18 चेंडूंमध्ये 37 धावा केल्या यामध्ये त्यांनी सात चौकार मारले आणि ही त्याची खेळी संघासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकते.
Na(𝙈𝘼𝙉) of crucial cameos 😎
Final flourish of 37(18) that propelled #MI to a solid total 👌
Updates ▶ https://t.co/vIzPVlDqoC#TATAIPL | #PBKSvMI | #Qualifier2 | #TheLastMile | @mipaltan pic.twitter.com/S8KRr7R37V
— IndianPremierLeague (@IPL) June 1, 2025
युझवेंद्र चहल याने संघाला एक विकेट मिळवून दिला चहलने सूर्यकुमार यादव याला बाद केला. केले जेमीसन त्याने तिलक वर्मा याला बाहेरच रस्ता दाखवला. अजमततुला उमरजाई याने संघाला दोन विकेट्स मिळवून दिले. हार्दिक पांड्या आणि नमन धीर या दोघांना पवेलियनचा रस्ता दाखवला. मार्कस स्टॉयनिस याने संघाला पहिलाच विकेट मिळवून दिला तो म्हणजेच रोहित शर्माचा. वैशाख विजयकुमार यांना देखील सांगायला एक विकेट मिळवून दिला त्याने जॉनी बेयरस्टो याला बाहेरचा रस्ता दाखवला. अर्शदीप सिंह याला आज एकही विकेट हाती लागला नाही.