फोटो सौजन्य : IndianPremierLeague
मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स अपडेट : क्वालिफायर २ चा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यामध्ये हा सामना सुरू आहे हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. या सामन्याचे नाणेफेक पार पडले आहे या सामन्यात श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण नाणेफेक झाल्यानंतर मुसळधार पाऊस अहमदाबादला कोसळायला सुरुवात झाली आणि त्यामुळे मागील एक तासापासून सामना थांबवण्यात आला आहे.
9:30 पर्यंत म्हणजेच जवळजवळ १२० मिनिटे जर पाऊस सातत्याने पडत राहिला तर त्यानंतर सामन्याचे ओवर कमी करण्यात येतील. पण जर त्या आधीच सामना सुरू झाला तर एकही ओव्हर कमी केली जाणार नाही. पावसामुळे पिचवर मोठा परिणाम होणार आहे त्यामुळे फलंदाजांची मनमानी चालणार की गोलंदाजांची मनमानी चालणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
दोन्ही संघांनी प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे पंजाब किंग्स संघाने युझवेंद्र चहल याला पुन्हा संघामध्ये स्थान दिले आहे. तो दुखापतीमुळे मागील तीन सामन्यांमध्ये उपस्थित नव्हता. त्यामुळे संघाला मागील सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता त्याचबरोबर फलंदाजी देखील पंजाब किंग्स काही विशेष राहिली नाही. मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये देखील एक बदल करण्यात आला आहे मागील सामन्यांमध्ये प्लेइंग इलेव्हनचा भाग असलेला गिल्सन याला दुखापतीमुळे संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. त्याच्या जागेवर संघामध्ये रीस टॉपली याला स्थान मिळाले आहे.
It has started to rain again in Ahmedabad 🌧️
We will be back shortly with further updates.#TATAIPL | #PBKSvMI | #Qualifier2 | #TheLastMile https://t.co/dJ15ov7NsU
— IndianPremierLeague (@IPL) June 1, 2025
आजचा सामना जर रद्द झाला तर जो संघ पॉइंट टेबलमध्ये वरच्या स्थानावर आहेत त्याला फायनलमध्ये स्थान मिळणार आहे. पॉइंट टेबलची स्थिती पाहता पंजाब किंगचा संघ पहिल्या स्थानावर आहे तर मुंबई इंडियन्स संघ हा चौथा क्रमांकवर आहे. श्रेयस अय्यरने मागील सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली नाही त्यामुळे आजच्याच आमदार सामना सुरू झाला तर तो कशी कामगिरी करेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. आतापर्यंत श्रेयस याने कर्णधार म्हणून या सिझनमध्ये १५ सामने खेळले आहेत त्या 15 सामन्यांमध्ये त्याने 516 धावा गेल्या आहेत.