फोटो सौजन्य : Punjab Kings/Mumbai Indians
क्वालिफायर 2 – मुंबई इंडीयन्स विरुद्ध पंजाब किंग्स : क्वालिफायर 2 चा सामना सुरू झाला आहे हा सामना मुंबई विरुद्ध पंजाब या दोन संघांमध्ये खेळवला जात आहे. मुंबईचा संघ गुजरातच्या संघाला पराभूत करून क्वालिफायर दोन मध्ये आला आहे तर पंजाबच्या संघाला बंगळुरू विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा सामना दोन्ही संघांसाठी करो या मरोची स्थिती असणार आहे. आजच्या सामन्यात जो संघ विजयी होईल तो संघ फायनलमध्ये स्थान पक्के करणार आहे.
आजच्या सामन्यांमध्ये पंजाब किंग्सच्या संघामध्ये हरप्रीत ब्रार याला प्लेइंग इलेव्हन मधून बाहेर केले आहे. त्याच्या जागेवर युजवेंद्र चहलचे संघामध्ये पुनरागमन झाले आहे. मुंबई इंडियनच्या संघामध्ये देखील एक बदल करण्यात आला आहे. मागील सामन्यांमध्ये सामील झालेला ग्लिसन याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर काढण्यात आले आहे त्याच्या जागेवर रीस टॉपली याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे.
मागील दोन सामन्यांमध्ये युजवेंद्र चहल हा संघाबाहेर होता. आजच्या सामन्यात तो खेळणार आहे त्यामुळे तो आज कशी कामगिरी करेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मागील सामन्यांमध्ये रोहित शर्मा ने 81 धावांची खेळी खेळली होती त्यामुळे तो आज कशी कामगिरी करेल याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असेल. पंजाब किंग्सची मागील सामन्यात फलंदाजी खराब राहिली होती आज त्यांची फलंदाजी कशी राहील याकडे चाहत्यांचे लक्ष असेल.
🚨 Toss 🚨@PunjabKingsIPL won the toss and elected to bowl first against @mipaltan in #Qualifier2
Updates ▶️ https://t.co/vIzPVlDqoC#TATAIPL | #PBKSvMI | #TheLastMile pic.twitter.com/l3PcmZvc9Y
— IndianPremierLeague (@IPL) June 1, 2025
प्रियांश आर्य, जाॅश इंग्लिस, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, अजमतुल्ला उमरझाई, काइल जेमिसन, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंह
इम्पॅक्ट प्लेअर – प्रभसिमरन सिंह, जेवियर बार्टलेट, हरप्रित ब्रार, सुर्यांश शेडगे, प्रवीण दुबे
रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, राज अंगद बावा, मिचेल सँटनर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, रिस टाॅप्ली
इम्पॅक्ट प्लेअर – अश्वनी कुमार, श्रीजीत कृष्णन, रघु शर्मा, राॅबिन मिन्ज, बेवन जेकब्स