IND vs NZ Final : रचिन रवींद्रकडून केन विल्यमसनचा विक्रम मोडीत, रचला मोठा इतिहास; फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
IND vs NZ Final : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचा फायनल सामना खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंड संघाकडून नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडने 7 विकेट्स गमावत भारतासमोर 252 धावांचे आव्हान उभे केले आहे. दरम्यान, या सामन्यात रचिन रवींद्रने 25 धावा करत मोठी कामगिरी केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 250 धावा करणारा न्यूझीलंडचा तो पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने केन विल्यमसनचा विक्रम मोडीत काढला.
रचिन रवींद्रने अवघ्या 14 चेंडूत 25 धावा करत ही कामगिरी केली आहे. पाकिस्तानमध्ये खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दोन सामन्यांमध्ये रचिन रवींद्रने शतके ठोकली आहेत. भारताविरुद्ध अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या रचिनने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या एकाच हंगामात 250 धावा करत इतिहास रचला आहे.
हेही वाचा : IND vs NZ Final : रोहित शर्माच्या यशस्वी कर्णधारपदावर डाग; अंतिम सामन्यात रचला ‘हा’ नकोसा विक्रम..
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची फायनल सुरू होण्यापूर्वी रचिनच्या नावे तीन सामन्यांत २२६ धावा जमा होत्या. रचिनच्या आधी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या एकाच हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम माजी कर्णधार केन विल्यमसनच्या नावावर होता. विल्यमसनने 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या हंगामात न्यूझीलंडकडून तीन सामने खेळले होते. त्यामध्ये त्याने एक शतक आणि दोन अर्धशतकांच्या जोरावर 244 धावा केल्या होत्या. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात रचिन 37 धावांवर बाद झाल्यानंतर त्याच्या खात्यावर 263 धावा जमा झाल्या होत्या.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या एकाच हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा माजी सलामीवीर आणि कर्णधार ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने 2006 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत वेस्ट इंडिजकडून आठ सामने खेळले होते. त्यात त्याने तीन शतकांच्या मदतीने 474 धावा चोपल्या होत्या. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये सर्वाधिक धावा रचिन रवींद्रच्या नावावर आहेत.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचा फायनल सामना खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 252 धावांचे आव्हान ठेवले आहे. डॅरिल मिशेल आणि मायकेल ब्रेसवेल यांच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर 7 विकेट्स गमावून न्यूझीलंड 251 धावांपर्यंत मजल मारू शकला. भारताकडून कुलदीप यादवसह वरुन चक्रवर्तीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या तर जाडेजा आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी एक विकेट मिळवली आहे. भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या नावावर करायची असेल तर 252 धावांचे आव्हान पेलावे लागणार आहे.
रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली , श्रेयस अय्यर , केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या , अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्ती.
विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, टॉम लॅथम (विकेटकिपर), डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कॅप्टन), काइल जेमिसन, विल्यम ओ’रोर्क आणि नाथन स्मिथ.