फोटो सौजन्य - BLACKCAPS सोशल मीडिया
रचिन रवींद्रचा अपघात : अलिकडेच, एकदिवसीय ट्राई-सीरीजमधील पहिल्या सामन्यांमध्ये न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान या दोन संघामध्ये सामना झाला, या सामन्यांमध्ये मोठा अपघात झाला आणि या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर काही वेळातच वाऱ्यासारखा व्हायरल झाला होता. न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्र क्षेत्ररक्षण करताना गंभीर जखमी झाला आणि त्याच्या कपाळामधून पाण्यासारखे रक्त वाहत होते. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने झेल घेण्याचा प्रयत्न केला पण चेंडू थेट त्याच्या कपाळावर लागला.
लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये चेंडू त्याच्या कपाळावर आदळताच त्याच्या कपाळातून रक्त वाहू लागले, त्याला मैदानाबाहेर लगेचच काढावे लागले. दुखापतीमुळे, रचिन तिरंगी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात खेळला नाही. या अष्टपैलू खेळाडूच्या दुखापतीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) वर तीव्र टीका होत आहे. या दुःखद अपघातानंतर, अनेक क्रिकेट चाहत्यांनी गद्दाफी स्टेडियमच्या फ्लडलाइट्सना दुखापतीसाठी जबाबदार धरले आहे. काही चाहत्यांनी सांगितले की नूतनीकरण होऊनही स्टेडियम चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या सामन्यांसाठी पूर्णपणे तयार नाही. स्टेडियममधील मूलभूत कमतरतांचे कारण देत लोकांनी चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने हलवण्याची मागणी केली.
आता माजी पाकिस्तानी कर्णधार सलमान बटने पीसीबीला टीकेपासून वाचवले. त्याने बोर्डाचा बचाव केला आणि दुखापतीसाठी रॅचिनला जबाबदार धरले. बट म्हणतो की स्टेडियममधील लाइटिंग ठीक होती. “जेव्हा लोकांना समजून घ्यायचे नसते तेव्हा त्यांना समजावून सांगण्यात काही अर्थ नाही, हे असंबद्ध आहे. येथे अद्ययावत एलईडी दिवे बसवण्यात आले आहेत, हे ठीक आहेत. जेव्हा न्यूझीलंडचे खेळाडू १५० किलोमीटर प्रति तास वेगाने टाकलेल्या चेंडूंवर षटकार मारत होते, तेव्हा दिवे काम करत नव्हते का? ७० मीटर अंतरावर उभा असलेला खेळाडू चेंडू पकडण्यात अपयशी ठरतो कारण तो चुकीचा अंदाज घेतो. तो एक चांगला क्षेत्ररक्षक आहे पण कदाचित त्याचा पाय घसरला असेल आणि त्याला दुखापत झाली असेल.”
केन विल्यमसनने Champions Trophy 2025 आधी मोडला विराट कोहलीचा विक्रम!
पाकिस्तानच्या डावाच्या ३८ व्या षटकात रचिनला दुखापत झाली होती. खुसदिल शाहने डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे उंच शॉट मारला. अशा परिस्थितीत, रचिनने चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला पण तो योग्यरित्या न्याय करू शकला नाही. या सामन्यात यजमान पाकिस्तानला ७८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. न्यूझीलंड संघ तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. दुसऱ्या सामन्यात त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा चार विकेट्सने पराभव केला.
रचिन रवींद्र याला झालेल्या दुखापतीवर अजुनपर्यत कोणतीही माहिती किंवा अपडेट न्यूझीलंड क्रिकेट बोर्डने दिलेली नाही त्यामुळे तो चॅम्पियन ट्रॉफी खेळणार की नाही हे अजुनपर्यत अस्पष्टच आहे.