फोटो सौजन्य – X
शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने इंग्लंड विरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. रोहित शर्माचे निवृत्तीनंतर शुभमन गिल याला भारतीय संघाचे कर्णधार पद सोपवण्यात आले आहे. पहिला पराभवानंतर आता भारतीय संघाची नजर सामन्याच्या विजयावर असणार आहे. टीम इंडियाला पहिला पराभवानंतर आता भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी शुभमन गिलबद्दल कौतुकाचे पूल बांधले आहेत. पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाची कमालीची कामगिरी राहिली पण टीम इंडीयाचे गोलंदाज फार काही खास कामगिरी करु शकले नाही.
दुसरा सामना हा एजबॅस्टन स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय संघासाठी महत्वाचा असणार आहे, कारण पहिल्या सामन्यामध्ये इंग्लडच्या संघाने विजय मिळवुन मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी संघ व्यवस्थापनाला विनंती केली आहे की भारत इंग्लंडविरुद्धची चालू मालिका गमावला तरी शुभमन गिलला कर्णधारपदी कायम ठेवावे.
सामन्यादरम्यान फंलंदाज मैदानात कोसळला! हृदयविकाराने मृत्यू, VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का
लीड्स कसोटीतील पराभवानंतर शास्त्री यांनी नवीन आणि तरुण कर्णधार गिलचे कौतुक केले. त्यांनी गिलच्या परिपक्वतेचे कौतुक केले. इतकेच नाही तर माजी मुख्य प्रशिक्षकाने संघ व्यवस्थापनाला त्याला ३ वर्षांसाठी कर्णधारपदी ठेवण्याची विनंती केली.
“तो खूप परिपक्व झाला आहे. तो ज्या पद्धतीने मीडियाशी वागतो, पत्रकार परिषदांमध्ये, नाणेफेकीत ज्या पद्धतीने बोलतो, त्यामुळे तो खूप परिपक्व झाला आहे. त्याला तीन वर्षे संघात राहू द्या. मालिकेत काहीही घडले तरी त्यात कोणतेही बदल करू नका. तीन वर्षे त्याच्यासोबत राहा. मला वाटते की तो तुमच्यासाठी चांगले करेल,” असे शास्त्री यांनी विस्डेनला सांगितले.
शास्त्रींचा असा विश्वास आहे की गिलमध्ये एक महान खेळाडू बनण्यासाठी सर्व गुण आहेत. त्याला वेळेनुसार परिस्थितीशी जुळवून घेणे आवश्यक आहे. तो म्हणाला, “गिल पुढे जाऊ शकला नाही तर मला निराशा होईल. फलंदाजी करताना त्याची शैली राजेशाही आहे. जर तो अनुभवाने शिकू शकला आणि परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेऊ शकला, तर मला वाटते की तो एक असे नाव आहे ज्याकडे मी पाहू शकतो.”