फोटो सौजन्य : IndianPremierLeague
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स टाॅस अपडेट : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स यांच्यामध्ये सामना सुरू झाला आहे क्वालिफायर 1 चा सामना या दोन संघांमध्ये रंगणार आहे. सामन्याआधी संघाचे दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानावर एकत्र आले. या सामन्यात रजत पाटीदारने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील सामन्यांमध्ये पंजाबच्या संघाने मुंबईच्या संघाला पराभूत करून गुणतालिकेमध्ये पहिले स्थान गाठले आहे. आजचा सामन्यात जो संघ विजयी ठरेल तो संघ आयपीएल २०२५ चा फायनल सामना खेळताना दिसेल.
आजच्या सामन्यामध्ये बंगळुरुच्या संघामध्ये संघाचा कर्णधार रजत पाटीदार पुन्हा संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. त्याचबरोबर जोश हेजलवुडचे संघामध्ये पुनरागमन झाले आहे. तर पंजाब किग्सच्या संघामध्ये मोठा बदल झाला आहे, आज संघामध्ये मार्को यान्सन या त्याच्या देशामध्ये परतला आहे.
IPL 2025 : सामने फक्त 4 कोणाच्या हाती लागणार ऑरेंज कॅप! विराट कोहली यादीत कोणत्या स्थानावर?
बंगळुरूच्या संघाने लखनऊचा पराभूत करून टॉप 2 मध्ये स्थान पक्के केले होते, त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स हा वरच्या थरावर असेल. मागील सामन्यांबद्दल सांगायचे झाले तर लखनऊच्या संघाविरुद्ध जितेश शर्मा याने शेवटच्या ओव्हरमध्ये कमालीची कामगिरी करून संघाला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे आज त्याचे कामगिरीवर चाहत्यांचे लक्ष असेल, त्याचबरोबर विराट कोहलीने देखील या सामन्यात अर्धशतक झळकावले होते.
🚨 Toss 🚨@RCBTweets won the toss and elected to bowl against @PunjabKingsIPL in Qualifier 1⃣
Updates ▶ https://t.co/aHIgGazpRc#TATAIPL | #PBKSvRCB | #Qualifier1 | #TheLastMile pic.twitter.com/qsBei0DQqG
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2025
मागील सामन्यांमध्ये नुकताच आरसीबीच्या संघामध्ये सामील झालेला मयंक अग्रवाल यांनी देखील संघासाठी कमालीची कामगिरी केली होती. आज तो कशी कामगिरी करायला हे पाहणे मनोरंजक ठरेल.
फिल सॉल्ट, विराट कोहली, लियाम लिविंगस्टन, टीम शेफर्ड, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), क्रुणाल पंड्या, जोश हेजलवुड, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, सुयश शर्मा
प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, जोश इंग्लिस, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, अजमतुल्ला उमरझाई, हरप्रीत ब्रार, काइल जेमिसन, अर्शदीप सिंह