RCB Vs PBKS : पंजाब किंग्जकडून आरसीबीचा घरच्या मैदानावर धुव्वा (फोटो-सोशल मिडिया)
RCB Vs PBKS : इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या ३४ व्या सामन्यात, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना पंजाब किंग्जशी झाला. पंजाबने हा सामना ५ विकेट्सने जिंकला. आरसीबीचा हा सात सामन्यांतील चौथा पराभव होता. पंजाबचा हा सात सामन्यांमधील पाचवा विजय होता. आरसीबीने घरच्या मैदानावर सलग तिसरा सामना गमावला आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्जची सुरुवातही चांगली झाली नाही. ‘इम्पॅक्ट सब’ म्हणून आलेले प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग फार काही करू शकले नाहीत. १३ धावा काढून भुवनेश्वर कुमारने प्रभसिमरनला बाद केले. तर प्रियांशला जोश हेझलवूडने १६ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद केले. प्रियांश बाद झाला तेव्हा पंजाबची धावसंख्या दोन बाद ३२ धावा होती. येथून श्रेयस अय्यर आणि जोश इंगलिस यांनी मिळून पंजाबचा धावसंख्या ५० च्या पुढे नेला.
हेही वाचा : RR vs LSG : राजस्थान रॉयल्सला विजय आवश्यकच..! आज लखनौ सुपर जायंट्सचे आव्हान
जोश हेझलवूडने ८ व्या षटकात श्रेयस अय्यर आणि जोश इंगलिस यांना बाद करून पंजाब किंग्जची धावसंख्या ४ बाद ५३ अशी केली. श्रेयसने ७ आणि इंग्लिसने १४ धावा केल्या. येथून, नेहल वधेरा आणि शशांक सिंग यांनी २८ धावांची भागीदारी केली, ज्यामुळे पंजाब विजयाच्या जवळ पोहोचला. तथापि, शशांक फक्त १ धाव करू शकला आणि त्याची विकेट भुवनेश्वर कुमारने घेतली. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने निर्धारित १४ षटकांत ९ गडी गमावून ९५ धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची सुरुवात चांगली झाली नाही आणि ४ षटकांच्या पॉवरप्लेमध्ये त्यांनी ३ विकेट गमावल्या.
हेही वाचा : MI vs SRH : लाईव्ह सामन्यात नीता अंबानी रागाने लालबुंद, तर हार्दिक पंड्याही दिसला चिडलेला, जे घडलं ते..
प्रथम, फिल सॉल्ट चार धावा करून बाद झाला. त्यानंतर दुसरा सलामीवीर विराट कोहलीही १ धाव करून बाद झाला. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने कोहली आणि साल्ट दोघांनाही बाद केले. त्यानंतर चौथ्या षटकात ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज झेवियर बार्टलेटने लियाम लिव्हिंगस्टोनला (४ धावा) बाद केले. आरसीबीच्या फलंदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच राहिली. त्याच क्रमात, जितेश शर्मा (२ धावा) आणि कृणाल पंड्या (१ धाव) देखील स्वस्तात बाद झाले. जितेशला युजवेंद्र चहलने त्याच्या फिरकी गोलंदाजीने पायचीत केले, तर कुणालला मार्को जॅनसेनने धावबाद केले.चहलच्या चेंडूवर सेट झाल्यानंतर कर्णधार रजत पाटीदारही बाद झाला. पाटीदारने एक चौकार आणि एक षटकार मारला. च्या मदतीने १८ चेंडूत २३ धावा काढल्या.