गुजरात समोर वैभवला रोखण्याचे आव्हान (फोटो- ians)
गुजरात टायटन्स अन् राजस्थान रॉयल्समध्ये क्वालिफायर 2 सामना
न्यू चंदीगडच्या क्रिकेट स्टेडियमवर फायनलच्या तिकीटासाठी भिडणार
वैभव सूर्यवंशीला रोखण्याचे गुजरातसमोर असणार आव्हान
Tata IPL 2026 GT Vs RR Qualifier 2: आज न्यू चंदीगडमधील क्रिकेट स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये महत्वाचा सामना होणार आहे. आज क्वालिफायर 2 होणार आहे. यातून जिंकणारा संघ फायनलमध्ये आरसीबीविरुद्ध खेळणार आहे. त्यामुळे आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. मात्र आज वैभव सूर्यवंशीला रोखण्याचे आव्हान गुजरातसमोर असणार आहे. त्याबाबत गुजरातचा गेम प्लॅन काय असू शकतो ते जाणून घेऊयात.
क्वालिफायर 1 मध्ये आरसीबी आणि गुजरातचा सामना झाला होता. या सामन्यात गुजरातचा पराभव झाला. मात्र आज त्यांना क्वालिफायर 2 च्या निमित्ताने फायनलमध्ये जाण्याची आणखी एक संधी असणार आहे. मात्र त्यांच्यासमोर राजस्थान रॉयल्ससारखा मजबूत संघ असणार आहे. गुजरात टायटन्ससमोर वैभव सूर्यवंशीचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे. वैभवने एसआरएचविरुद्ध केलेल्या कामगिरीची दखल गुजरातला घ्यावी लागली आहे.
वैभव सूर्यवंशीने यंदाच्या हंगामात 680 रन्स करून ऑरेंज कॅप पटकावली आहे. 15 वर्षीय वैभव राजस्थानचा सर्वात प्रमुख फलंदाज बनला आहे. आता गुजरात टायटन्स वैभवला कसे रोखणार यावर टायटन्सच्या कोचने प्रतिक्रिया दिली आहे. वैभव ज्या प्रकारे फलंदाजी करत आहे ते पाहून चांगले वाटत आहे, असे कोच म्हणाले. आम्ही त्याला लवकरच आउट करण्यात यशस्वी होऊ असा आम्हाला विश्वास आहे. आम्ही त्याच्या फलंदाजीचे व्हिडिओ पाहून त्याला आउट करण्याचा प्लॅन तयार केला आहे.
आजचा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाचा असेल. जो संघ जिंकेल तो 31 तारखेला अहमदाबादमध्ये आरसीबीविरुद्ध फायनल खेळेल. तसेच जो संघ जिंकेल तो संघ आयपीएल 2026 मधून बाहेर जाणार आहे. चंदीगडच्या स्टेडियमची खेळपट्टी धावांचा पाठलाग करण्यासाठी ओळखली जाते. मात्र मागील सामन्यात मोठ्या टार्गेटचा पाठलाग करताना एसआरचची फलंदाजी कोसळली होती.
गुजरात टायटन्स :शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर, निशांत सिंधू, राहुल तेवाटिया, वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, रशीद खान, मोहम्मद सिराज, कागिसो रबाडा, प्रसीद कृष्णा.
राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, डोनोवन फरेरा, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, रवी बिश्नोई, नांद्रे बर्गर, संदीप शर्मा.






