सुदर्शन पटनायक यांनी वैभव सूर्यवंशीचा केला अनोखा सन्मान (फोटो- ians)
वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी वैभव सूर्यवंशीचा केला अनोखा सन्मान
ओडीशाच्या पुरी बीचवर पटनायक यांनी साकारले वैभवचे वाळूशिल्प
वैभव सूर्यवंशीने एसआरएचविरुद्ध केली 97 रन्सची आक्रमक खेळी
Sand Art To Vaibhav Suryvanshi: आयपीएल 2026 चा थरार अंतिम टप्प्यात आला आहे. सध्या प्ले ऑफचे सामने सुरू आहेत. आज क्वालिफायर 2 चा सामना होणार आहे. यामध्ये गुजरात टायटन्स अन् राजस्थान रॉयल्सचे संघ आमनेसामने येणार आहेत. या हंगामात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने जबरदस्त कामगिरी केली आहे. सध्या तो जबरदस्त फॉर्ममध्ये खेळत आहे. त्याच्या कामगिरीची दखल जगप्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी घेतली आहे.
वैभव सूर्यवंशी आयपीएल 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. ऑरेंज कॅप तो मानकरी आहे. 680 पेक्षा जास्त रन्स त्याने यंदाच्या हंगामात केली आहे. सध्या क्रिकेट विश्वात वैभव सूर्यवंशी केंद्रस्थानी आहे. त्याच्या या अभूतपूर्व यशाचा आनंद साजरा करण्यासाठी पद्मश्री पुरस्कार विजेते वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी पुरीच्या समुद्रकिनाऱ्यावर वैभवचे एक अतिशय सुंदर वाळूशिल्प साकारले आहे.
पद्मश्री पुरस्कार विजेते वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी पुरी समुद्रकिनाऱ्यावर वैभवचे सुंदर असे वाळूशिल्प साकारले आहे. सुदर्शन पटनायक यांनी साकारलेल्या या कलाकृतीमध्ये वैभव सूर्यवंशीची बॅटिंग करतानाची प्रतिकृती आणि क्रिकेट बॅट दाखवण्यात आली आहे. या वाळूशिल्पावर अभिनंदन वैभव असा संदेश देण्यात आला आहे. अवघ्या १५ व्या वर्षी आयपीएलमध्ये अशा प्रकारची खेळी करणे ही देशासाठी अभिमानास्पद गोष्ट असल्याचे पटनायक यांनी आपल्या कलेतून व्यक्त केले आहे. एसआरएचविरुद्ध वैभवने 97 रन्सची आक्रमक खेळी केली होती. त्याबद्दल सुदर्शन पटनायक यांनी वैभवचा अनोखा सन्मान केला आहे.
Vaibhav Suryvanshi ला रोखण्यासाठी गुजरातचा प्लॅन काय?
वैभव सूर्यवंशीने यंदाच्या हंगामात 680 रन्स करून ऑरेंज कॅप पटकावली आहे. 15 वर्षीय वैभव राजस्थानचा सर्वात प्रमुख फलंदाज बनला आहे. आता गुजरात टायटन्स वैभवला कसे रोखणार यावर टायटन्सच्या कोचने प्रतिक्रिया दिली आहे. वैभव ज्या प्रकारे फलंदाजी करत आहे ते पाहून चांगले वाटत आहे, असे कोच म्हणाले. आम्ही त्याला लवकरच आउट करण्यात यशस्वी होऊ असा आम्हाला विश्वास आहे. आम्ही त्याच्या फलंदाजीचे व्हिडिओ पाहून त्याला आउट करण्याचा प्लॅन तयार केला आहे.
आजचा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाचा असेल. जो संघ जिंकेल तो 31 तारखेला अहमदाबादमध्ये आरसीबीविरुद्ध फायनल खेळेल. तसेच जो संघ जिंकेल तो संघ आयपीएल 2026 मधून बाहेर जाणार आहे. चंदीगडच्या स्टेडियमची खेळपट्टी धावांचा पाठलाग करण्यासाठी ओळखली जाते. मात्र मागील सामन्यात मोठ्या टार्गेटचा पाठलाग करताना एसआरचची फलंदाजी कोसळली होती.






