फोटो सौजन्य - JioHotstar सोशल मीडिया
Chennai Super Kings vs Rajasthan Royals : कालचा सामना अत्यंत रोमांचक झाला, या सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये कडाक्याची लढत पाहायला मिळाली. राजस्थान रॉयल्सच्या संघाने रियान परागच्या नेतृत्वात संघासाठी आयपीएल २०२५ मध्ये पहिला विजय मिळवला तर चेन्नई सुपर किंग्सला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. रियानच्या कॅप्टन्सीचे कौतुक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत आहे. आता रियान परागचा मैदानावरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध एक जबरदस्त झेल घेतलाहा झेल शिवम दुबेने घेतला होता, जो त्याच्या बॅटने कहर करत होता.
सोशल मीडियावर रियान परागने घेतलेला कॅचचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, रियानने संघासाठी एक अशक्य झेल घेतला आणि शिवमला बाद केले. कॉमेंटेटर करणाऱ्या तज्ज्ञांनी सांगितले की हा झेल सामना बदलणारा ठरू शकतो. शेवटी, हे खरे ठरले. शिवम दुबे ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता, त्यामुळे तो चेन्नईसाठी सामना जिंकू शकला असता. पण रियान परागने एका हाताने डायव्हिंग कॅच घेत शिवमचा डाव संपवला. यासह त्याने राजस्थानच्या विजयाच्या आशांचा मार्ग मोकळा केला.
Captain Riyan Parag replies with a fantastic catch 🤯#CSK lose Shivam Dube in the chase
Updates ▶️ https://t.co/V2QijpWpGO#TATAIPL | #RRvCSK | @rajasthanroyals pic.twitter.com/fPG0OhNcyg
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2025
चेन्नई सुपर किंग्जच्या डावातील दहावे षटक चालू होते ही ओव्हर राजस्थान रॉयल्सकडून वानिंदू हसरंगा टाकत होता. हसरंगाच्या पहिल्या दोन चेंडूंवर शिवम दुबेने एक षटकार आणि एक चौकार मारला होता. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर शिवम दुबेने ऑफ साईडवर एक शक्तिशाली शॉट खेळला. चेंडू जमिनीला समांतर तरंगत होता आणि सीमा ओलांडत होता. त्यानंतर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग, जो एक्स्ट्रा कव्हरवर उभा होता, त्याने डायव्ह मारला आणि उजव्या हाताच्या बोटांमध्ये चेंडू पकडला. यानंतर रियान परागने खूप सेलिब्रेशन केले.
तिसऱ्या पंचांनी चेंडू जमिनीला स्पर्श केला आहे की नाही हे पाहण्यासाठी कॅच तपासला. झेल स्वच्छ असल्याचे स्पष्ट होताच, राजस्थान रॉयल्सच्या चाहत्यांनी आनंदाने उड्या मारल्या. चेन्नईच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी केली, यावेळी राजस्थानने पहिल्या डावांमध्ये १८२ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यात चेन्नई सुपर किंग्सचे फलंदाज अपयशी ठरले. ते फक्त १७६ धावा करू शकले आणि त्यांनी सीझनचा दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.