फोटो सौजन्य - सोशल मीडिया
रोहित शर्मा विरुद्ध पॅट कमिन्स : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एमसीजी कसोटीचा आज पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. टीम इंडियाला विजयासाठी ३४० धावांचे लक्ष्य मिळाले आहे. या धावसंख्येचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा यांनी भारताला दमदार सुरुवात करून दिली होती, मात्र पॅट कमिन्सने एका षटकात दोन विकेट घेत टीम इंडियाला बॅकफूटवर ढकलले. १७ व्या षटकात पॅट कमिन्सने प्रथम भारतीय कर्णधार रोहित शर्माची शिकार केली आणि नंतर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर केएल राहुलला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
रोहित शर्माच्या विकेटसह पॅट कमिन्सने विश्वविक्रम रचला. कर्णधार विरुद्ध कर्णधार या लढतीत रोहित शर्माला सर्वाधिक वेळा बाद करणारा तो गोलंदाज ठरला आहे. एमसीजीपूर्वी पॅट कमिन्सने रोहित शर्माला कसोटी क्रिकेटमध्ये चार वेळा कर्णधारपदावरून बाद केले होते, या सामन्याच्या दोन्ही डावात कमिन्सने रोहितची विकेट घेतली होती. अशा परिस्थितीत रोहितची 6 वेळा शिकार करून पॅट कमिन्स आता कर्णधार विरुद्ध कर्णधार लढतीत नंबर-१ गोलंदाज बनला आहे. याआधी कॅप्टन विरुद्ध कॅप्टन या लढतीत रिची बेनॉडने टेड डेक्सटरला ५ वेळा आणि इम्रान खानने सुनील गावस्करला प्रत्येकी ५ वेळा बाद केले होते.
IND vs AUS : टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! मेलबर्नमधील कसोटी क्रिकेटचे सर्वात मोठे टार्गेट किती?
पॅट कमिन्सने रोहित शर्माला ६ वेळा बाद केले*
५ वेळा टेड डेक्सटरला रिची बेनॉडने बाद केले
इम्रान खानने सुनील गावस्करला ५ वेळा बाद केले
रिची बेनॉडने ४ वेळा गुलाबबाई रामचंदला बाद केले
कपिल देवने क्लाइव्ह लॉयडला ४ वेळा बाद केले
रिची बेनॉडने पीटर मेला ४ वेळा बाद केले
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावानंतर १०५ धावांची आघाडी घेतली होती. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर यजमान संघाने स्टीव्ह स्मिथच्या शतकाच्या बळावर ४७४ धावा केल्या होत्या, त्याला प्रत्युत्तरात नितीश रेड्डींच्या शतकाच्या जोरावर भारताने ३६९ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २३४ धावा केल्या आणि भारतासमोर ३४० धावांचे लक्ष्य ठेवले.
सध्या भारताच्या संघासाठी यशस्वी जैस्वाल आणि रिषभ पंत फलंदाजी करत आहेत. टीम इंडियाने तीन विकेट्स गमावले आहेत यामध्ये रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली हे फलंदाज बाद झाले आहेत. यशस्वी जैस्वालने अर्धशतक ठोकले आहे, तर रिषभ पंत सुद्धा टीम इंडियासाठी चांगली फलंदाजी करत आहे. भारताच्या संघाला जिंकण्यासाठी ४० ओव्हरमध्ये २३३ धावा करणे गरजेच्या आहेत. भारतचे युवा खेळाडूंनी या मालिकेमध्ये कमाल केली आहे परंतु अनुभवी फलंदाज विराट कोहली, रोहित शर्मा मागील काही सामान्यांपासून मोठी कामगिरी करू शकले नाही.