फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore 1st innings report : राजस्थान रॉयल विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये सध्या सामना सुरु आहे. या सामन्याचे आयोजन सवाई मानसिंग स्टेडियमवर करण्यात आले आहे. आजच्या सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावांमध्ये राजस्थानच्या संघाने फलंदाजीचे आव्हान स्वीकारत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघासमोर १७४ धावांचे लक्ष्य उभे केले आहे. आजच्या सामान्यांच्या पहिल्या डावांमध्ये खेळाडूंनी कशी कामगिरी केली यावर एकदा नजर टाका.
आजच्या सामन्यांमध्ये यशस्वी जयस्वालने संघासाठी महत्त्वाची खेळी खेळली. त्याने ४७ चेंडूंमध्ये ७५ धावा केल्या यामध्ये त्याने दोन षटकार आणि दहा चौकार ठोकले. त्यानंतर जोश हेझलवूडने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. तर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसंग या सामन्यात मोठी कामगिरी करण्यात अपयशी ठरला. त्याने १९ चेंडूंमध्ये १५ धावा केल्या. रियान परागने संघासाठी २२ चेंडूमध्ये ३० धावा केल्या यामध्ये त्याने १ षटकार आणि ३ चौकार मारले.
Innings Break!#RR post a competitive 1⃣7⃣3⃣ / 4⃣ on the back of Yashasvi Jaiswal’s impressive 75(47) 👌
Will #RCB chase this down and seal 2⃣ points? 🤔
Updates ▶ https://t.co/rqkY49M8lt#TATAIPL | #RRvRCB | @rajasthanroyals | @RCBTweets pic.twitter.com/BHf8fMx4qR
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2025
ध्रुव जुरेलने संघासाठी २३ चेंडूंमध्ये ३५ धावा केल्या आहेत यामध्ये त्याने २ षटकार आणि २ चौकार मारले आहेत. सुरुवातीला जुरेलने फलंदाजी संथ गतीने केली त्यानंतर शेवटच्या ३ ओव्हरमध्ये त्याने मोठी शॉट मारले आणि नाबाद राहिला. शिमरॉन हेटमायरने संघाने आजच्या सामन्यात विशेष कामगिरी केली नाही आजच्या सामन्यात त्याने ९ धावा केल्या आणि भुवनेश्वर कुमारने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवलानितीश राणा शेवटच्या २ चेंडू शिल्लक असताना आला आणि त्याने १ चौकार मारला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर यश दयालने संघासाठी एक विकेट घेतला तर जोश हेझलवूडने सुद्धा संघाला एक विकेट मिळवून दिला. बंगळुरूचा फिरकी गोलंदाज कृणाल पंड्याने संघाला एक विकेटची कमाई करून दिली. राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर जोफ्रा आर्चर कमालीच्या फॉर्ममध्ये आहे त्यामुळे तो आज कशी गोलंदाजी करेल हे पाहणे मनोरंजक ठरेल.
आजच्या सामन्यांमध्ये विशेष लक्ष्य बंगळुरूच्या फलंदाजांवर असणार आहे. बंगळुरूचे फलंदाज सध्या दमदार फॉर्ममध्ये आहेत, फिल्ल सॉल्ट आणि विराट कोहली संघाला चांगली दमदार सुरुवात करून देत आहेत. त्यामुळे त्यांच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असणार आहे. संघाचा कर्णधार रजत पाटीदार याने या स्पर्धेमध्ये कमालीची फलंदाजी केली आहे त्याचबरोबर वेगाने फलंदाजी केली आहे त्यामुळे आज त्याच्या कामगिरीवर चाहत्यांचे लक्ष असणार आहे.