WTC Final साऊथ आफ्रिकेचा डाव १३८ वर समाप्त(फोटो-सोशल मीडिया)
WTC Final : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनमधील लॉर्ड्स मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चा अंतिम सामना खेळला जात आहे. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघ सर्वबाद २१२ धावा करू शकला. साऊथ आफ्रिकेचा वेगवान रबाडाने अंतिम सामन्यात ५ विकेट्स घेऊन ऑस्ट्रेलियाला जेरीस आणले. पहिल्या दिवशीच साऊथ आफ्रिका फलंदाजीसाठी मैदानात आली होती. आता साऊथ आफ्रिकेचा पहिला डाव १३८ धावांवर गडगडला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने ६ विकेट्स घेऊन साऊथ आफ्रिकेचे कंबरडे मोडले आहे. आता ऑस्ट्रेलियाकडे ७४ धावांची आघाडी आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या दिवशी २१२ धावांवर सर्वबाद झाला. त्यांनंतर साऊथ आफ्रिका फलंदाजीसाठी आली. साऊथ आफ्रिकेला पहिल्या दिवशी सुरवातीलाच मोठे धक्के बसले. मिचेल स्टार्कने एडेन मार्कराम आणि रायन रिकेलटनला(१६ धावा) देखील स्टार्कने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तर, वियान मुल्डरला(४४ चेंडू ६ धावा) कर्णधार पॅट कमिन्सने बाद केले. तसेच धोकादायक फलंदाज ट्रिस्टन स्टब्सला २ धावांवर बाद केले. त्यांतर कर्णधार टेम्बा बावुमा आणि डेव्हिड बेडिंगहॅम यांनी डाव सवरण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज गुरुवारी पॅट कमिन्सचे वादळ घेंघावले. टेम्बा बावुमाला पॅट कमिन्सने माघारी धाडले. त्याने ८४ चेंडूचा सामना करत ३६ धावा केल्या. तर काइल व्हेरेन जास्त वेळ खेळु शकल नाही. त्याला १३ धावांवर पॅट कमिन्सने १३ धावांवर बाद केले.
हेही वाचा : ‘हे ऐकून खूप धक्का बसला…’, Ahmedabad plane crash वर Harbhajan Singh ची भावुक प्रतिक्रिया..
तसेच एकाबाजूने डेव्हिड बेडिंगहॅम खेळत होता. समोरून विकेट्स जात असताना बेडिंगहॅमलाही पॅट कमिन्सने आपला शिकार बनवले. त्याने १११ चेंडूत ४५ धावा केल्या. त्यांनंतर साऊथ आफ्रिकेचा एकही खेळाडू तग धरू शकला नाही. मार्को जानसेन ०, केशव महाराज ७, कागिसो रबाडा १ धावा करू शकले तर लुंगी एनगिडी शून्यावर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्सने १९ ओव्हरमध्ये २८ धावा देत सर्वाधिक ६ विकेट्स मिळवल्या. यासोबत त्याने टेस्ट करियरमध्ये ३०० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. तसेच मिचेल स्टार्कने १३ ओव्हरमध्ये २ ४१ धावा देत २ विकेट्स घेतल्या. जोश हेझलवुडला १ विकेट मिळाली. तर नॅथन लायन आणि ब्यू वेबस्टर यांना मात्र विकेट मिळू शकली नाही.
टेम्बा बावुमा (कर्णधार), एडेन मार्कराम, रायन रिकेल्टन, वियान मुल्डर, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल व्हेरेन, मार्को जानसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.
हेही वाचा : Ahmedabad plane crash ने क्रिकेट जगत शोकाकुल! Rohit Sharma सह इरफान पठाण झाले दुःखी, शेअर केली पोस्ट..
उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिशेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवुड.