Mohammad Rizwan broke Sarfaraz's record
Mohammad Rizwan broke Sarfaraz’s record : पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने आपल्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला आहे. रिजवान हा सर्वात जलद २००० कसोटी धावा करणारा पाकिस्तानचा यष्टिरक्षक ठरला. या काळात त्याने सर्फराज अहमदचा विक्रम मोडला. पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात रिझवानने ही कामगिरी केली. पहिल्या कसोटीत दारुण पराभवानंतर दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानने धमाकेदार कमबॅक करीत विजय प्राप्त केला. आता तिसऱ्या कसोटीत पाकिस्तानने पुन्हा एकदा चांगली खेळी करीत सामन्यात ऊर्जा आणली आहे.
तिसऱ्या कसोटी सामन्यात एक मोठा विक्रम
स्टार यष्टीरक्षक मोहम्मद रिझवानने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात एक मोठा विक्रम केला. रिजवान हा सर्वात जलद २००० कसोटी धावा करणारा पाकिस्तानचा यष्टीरक्षक ठरला आहे. रावळपिंडी कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने ही कामगिरी केली. रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर मालिकेतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना पाकिस्तान आणि इंग्लंडचे संघ आमनेसामने आहेत. रिझवानने केवळ 57 डावात मोठा विक्रम केला. त्याने 59 डावांत 2000 कसोटी धावांचा टप्पा गाठणारा सर्फराज अहमदचा विक्रम मोडला.
पाकिस्तानच्या एकदिवसीय आणि टी-२० संघाचा महत्त्वाचा भाग
मोहम्मद रिझवान हा गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानच्या एकदिवसीय आणि टी-२० संघाचा महत्त्वाचा सदस्य आहे. पण कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी तो संघर्ष करत आहे. त्याला या सामन्यापूर्वी 2000 कसोटी धावांचा टप्पा गाठण्यासाठी 16 धावांची गरज होती. कर्णधार शान मसूद बाद झाल्यानंतर रिझवान क्रीझवर आला. येताच त्याने जॅक लीचच्या चेंडूवर डीप मिडविकेटवर षटकार ठोकून आपला इरादा दाखवून दिला. मात्र, रेहान अहमदसमोर तो फार काळ टिकू शकला नाही.
रेहानने रिझवानला २५ धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
रिझवानने 46 चेंडूत 25 धावा
रेहान अहमदच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट होण्यापूर्वी रिझवानने 46 चेंडूत 25 धावा केल्या. ज्यामध्ये एक चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. स्पिनर रेहान अहमद पहिल्या दोन कसोटी सामन्यात खेळू शकला नाही. इंग्लंड संघाने त्याला तिसऱ्या कसोटीत आणले जेथे विकेट स्पिनर्सना अनुकूल होती. पाकिस्तानने पहिल्या डावात 344 धावा केल्या होत्या. इंग्लंडने पहिल्या डावात 267 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने दुसऱ्या डावात 24 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या. तो पाकिस्तानच्या पहिल्या डावापेक्षा 53 धावांनी मागे आहे.
रिझवानची कसोटी कारकीर्द
2016 मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या मोहम्मद रिझवानने 35 कसोटी सामन्यांमध्ये 2009 धावा केल्या आहेत. या काळात त्याची फलंदाजीची सरासरी ४१.८५ राहिली आहे. त्याने कसोटीत तीन शतके झळकावली आहेत. नाबाद १७१ धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. तो ऑगस्ट 2024 मध्ये रावळपिंडीमध्ये नझमुल हुसेन शांतोच्या नेतृत्वाखाली बांगलादेशविरुद्ध खेळला होता. पहिली कसोटी डावाने हरल्यानंतर पाकिस्तानने दुसऱ्या कसोटीत पुनरागमन केले. तीन सामन्यांच्या या मालिकेत रिझवानने ९९ धावा केल्या आहेत.