फोटो सौजन्य - IndianPremierLeague
श्रेयस अय्यर : 1 जून रोजी पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडीयन्स यांच्यामध्ये सामना पार पडला, या सामन्यात पंजाबच्या संघाने मुबंईच्या संघाला पराभुत करुन ५ विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयासह पंजाबच्या संघाने फायनलमध्ये स्थान पक्के केले आहे. पंजाब किंग्सचा संघ हा फायनलमध्ये राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध खेळणार आहे. पंजाबच्या संघाला क्वालिफायर १ मधून पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात संघाने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली होती. मुंबईविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर याने कमालीची कामगिरी केली आहे.
श्रेयस अय्यरने कालच्या सामन्यामध्ये ८७ धावांची दमदार खेळी खेळली त्याचबरोबर त्याने आणखी एकदा संघाला फायनलमध्ये नेऊन नवा विक्रम नावावर केला आहे. पंजाबच्या संघाने मुबंई इंडीयन्स विरुद्ध विजय मिळवुन संघाला तिसऱ्यादा फायनलमध्ये नेले आहे. २०१४ मध्ये पंजाबच्या संघाने फायनलमध्ये दुसऱ्यादा विजय मिळवला होता. त्यानंतर जवळजवळ ११ वर्षानंतर पुन्हा संघ फायनलमध्ये खेळताना दिसणार आहे. या विजयासह श्रेयस अय्यर याने कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये ५० वा विजय नोंदवला आहे. या पराक्रम करणारा तो पाचवा कर्णधार ठरला आहे.
याआधी अय्यर याने दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाइट राइडर्स आणि आता पंजाब किंग्स या संघाचे नेतृत्व केले आहे. त्याने ८५ सामन्यामध्ये संघाचे नेतृत्व केले आहे, यामध्ये त्याला ५० सामन्यात विजय मिळाला आहे तर ३४ सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे आणि २ सामन्याचा निकाल लागला नाही. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात संघाने ५७% विजय मिळवला आहे.
A 1⃣1⃣ year wait ends… 🥹#PBKS are in the #TATAIPL 2025 Final and who better than Captain Shreyas Iyer to take them through ❤
Scorecard ▶ https://t.co/vIzPVlDqoC#PBKSvMI | #Qualifier2 | #TheLastMile | @PunjabKingsIPL pic.twitter.com/vILymKxqXp
— IndianPremierLeague (@IPL) June 1, 2025
मुबंई इंडीयन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्याबद्दल सांगायचे झाले तर पंजाबच्या संघाने काल्च्या सामन्यामध्ये कमालीची कामगिरी केली. संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाबाद खेळी खेळत संघाला विजय मिळवुन देऊन फायनलमध्ये स्थान पक्के केले आहे. मुबंईच्या संघाला क्वालिफायर १ च्या सामन्यात ५ विकेट्सने पराभुत करुन दणदणीत विजय नोदंवला आहे.