फोटो सौजन्य - Robert Cianflone सोशल मीडिया
श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना : ऑस्ट्रेलियाच्या संघाची भारताविरुद्ध मागील महिन्यामध्ये बॉर्डर गावस्कर मालिका झाली. या मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाने ३-१ असा विजय मिळवून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये स्थान पक्के केले आहे. सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये दोन कसोटी सामान्यांचे आयोजन करण्यात आले आहे. आज या सामन्याचा चौथा दिवस आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ मजबूत स्थितीमध्ये उभा आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे.
श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या दोन सामान्यांच्या पहिल्या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा संघाने पहिल्या इनिंगमध्ये श्रीलंकेच्या गोलंदाजांचा घाम गाळला. ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर फलंदाज उस्मान ख्वाजा आणि ट्रॅव्हिस हेड या दोघांनी दमदार खेळ दाखवला. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये उस्मान ख्वाजा विशेष कामगिरी करू शकला नाही. पण श्रीलंका दौऱ्यावर ख्वाजाने सामान्यांच्या पहिल्याच इनिंगमध्ये द्विशतक ठोकून मैदानामध्ये धावांचा पाऊस केला. ख्वाजाने पहिल्या डावांमध्ये २३२ धावांची खेळी खेळली तर ट्रॅव्हिस हेडने संघासाठी ५७ धावांची महत्वाची खेळी खेळली.
मार्नस लॅबुशेन हा श्रीलंका दौऱ्यावर पहिल्या सामन्यात विशेष कामगिरी करू शकला नाही त्याने संघासाठी फक्त २० धावा केल्या. पण त्याची भरपाई ऑस्ट्रेलियाच्या संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने केली. स्टीव्ह स्मिथ याने त्याच्या कारकिर्दीमध्ये आणखी एक शतक जोडले आहे. स्टीव्ह स्मिथने संघासाठी शतक ठोकून १४१ धावांची खेळी खेळली. संघासाठी जोस इंग्लिश याने सुद्धा संघासाठी शतक ठोकले आणि १०२ धावांची मजबूत खेळी खेळली. ऍलेक्स कॅरी याने नाबाद ४६ धावा केल्या.
IND vs AUS : कर्णधार जोस बटलरने हर्षित राणाचा चपखल पर्याय बनल्यानंतर त्याचा राग टीम इंडियावर काढला
ऑस्ट्रेलियाचा गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर पहिल्या इनिंगमध्ये मॅथ्यू कुहनेमनने संघासाठी पाच विकेट्स घेतले, तर मिचेल स्टार्क याने संघासाठी विकेट्सची कमाई केली आहे. नथॅम लियॉन याने संघासाठी पहिल्या डावांमध्ये तीन विकेट्स नावावर केले आणि श्रीलंकेच्या संघाला १६५ धावांवर रोखलं. दुसऱ्या डावांमध्ये ८ ओव्हरमध्ये श्रीलंकेच्या संघाने २ विकेट्स गमावले आहेत.
या दोन संघामध्ये दोन सामान्यांच्या मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. आज या सामन्याचा चौथा दिवस आहे. या मालिकेचा दुसरा सामना रंगणार आहे. हा सामना ६ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी यादरम्यान खेळवला जाणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ श्रीलंकेविरुद्ध दोन सामान्यांची एकदिवसीय मालिका देखील खेळणार आहे.