फोटो सौजन्य - ICC सोशल मीडिया
श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया : सध्या श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. सध्या मालिकेचा दुसरा सामना सुरु आहे, ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यांमध्ये एकतर्फी सामना जिंकून मालिकेमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे. आता सुरु असलेल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्या डावांमध्ये श्रीलंकेला २५७ धावांवर रोखलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने पॅट कमिन्सच्या अनुपस्थित स्टीव्ह स्मिथने संघाची कमान हाती घेतली आहे. गॅले इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्याच्या पहिल्याच दिवशी स्टीव्ह स्मिथने इतिहास रचला.
कॅप्टन स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगचा विक्रम मोडला आहे आणि आता तो अव्वल स्थानावर पोहोचला आहे. श्रीलंकेच्या पहिल्या डावात स्टीव्ह स्मिथने २ झेल घेतले. यासह, तो कसोटीत सर्वाधिक झेल (यष्टीरक्षक वगळता) घेणारा ऑस्ट्रेलियन खेळाडू बनला.
SL vs AUS : ऑस्ट्रेलिया-श्रीलंका दुसऱ्या कसोटी सामन्यात हाईवोल्टेज ड्रामा, सोशल मीडियावर Video Viral
स्टीव्ह स्मिथ त्याच्या कारकिर्दीतील ११६ वा कसोटी सामना खेळत आहे. या काळात त्याने २२० डावांमध्ये १९७ झेल घेतले आहेत. तर रिकी पॉन्टिंगने त्याच्या कारकिर्दीत खेळलेल्या १६८ कसोटी सामन्यांपैकी ३२८ डावांमध्ये १९६ झेल घेतले. या यादीत मार्क वॉ तिसऱ्या, मार्क टेलर चौथ्या आणि अॅलन बॉर्डर पाचव्या स्थानावर आहेत. राहुल द्रविडने कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक झेल घेतले आहेत. या भारतीय दिग्गजाने १६४ कसोटी सामन्यांमध्ये २१० झेल घेतले.
स्टीव्ह स्मिथ : १९७ विकेट्स
रिकी पॉन्टिंग : १९६ विकेट्स
मार्क वॉ : १८१ विकेट्स
मार्क टेलर : १५७ विकेट्स
अॅलन बॉर्डर : १५६ विकेट्स
स्टीव्ह स्मिथ यांच्या दमदार फॉर्ममध्ये पुन्हा परतला आहे. स्टीव्ह स्मिथ अलीकडेच कसोटी क्रिकेटमध्ये १०,००० धावा करणारा चौथा ऑस्ट्रेलियन खेळाडू बनला. एवढेच नाही तर स्मिथने युनूस खान, सुनील गावस्कर, ब्रायन लारा आणि महेला जयवर्धने यांना मागे टाकत त्याचे ३५ वे कसोटी शतकही झळकावले. या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा एक डाव आणि २४२ धावांनी पराभव केला. मालिकेतील दुसरी कसोटीही गॅले येथे खेळली जात आहे. या सामन्यात कर्णधार स्मिथकडून मोठी खेळी अपेक्षित आहे.
– 141 runs in first Test.
– Fifty in Second Test.CAPTAIN STEVE SMITH IN SRI LANKA IN TOUGH CONDITION – The Greatest in Modern Era in Test. 🐐 pic.twitter.com/nZWGmpDYHC
— Johns. (@CricCrazyJohns) February 7, 2025
स्टीव्ह स्मिथने आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीत ११५ कसोटी सामने खेळले आहेत. या काळात त्याने २०५ डावांमध्ये ५६.३३ च्या सरासरीने आणि ५३.५८ च्या स्ट्राईक रेटने १०१४० धावा केल्या आहेत. स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये ४१ अर्धशतके आणि ३५ शतके झळकावली आहेत. तो कसोटी शतकांमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांमध्ये ७ व्या क्रमांकावर आहे. स्मिथचा कसोटीतील सर्वोत्तम धावसंख्या २३९ धावा आहे.