फोटो सौजन्य - सोशल मीडिया
चॅम्पियन ट्रॉफी २०२५ – दक्षिण आफ्रिका : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या चॅम्पियन ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व संघाची टीमची घोषणा देखील केली आहे. चॅम्पियन ट्रॉफीचे यजमान पद पाकिस्तानकडे आहे पण स्पर्धा हायब्रीड पद्धतीने खेळवली जाणार आहे. भारताचे सर्व सामने युएईमध्ये खेळवले जाणार आहे तर इतर संघाचे सामने पाकिस्तानमध्ये होणार आहेत.
आता दक्षिण आफ्रिका संघाच्या अडचणींमध्ये वाद होताना दिसत आहे. संघातील अनेक खेळाडू दुखापतींच्या समस्येशी झुंजत आहेत. आता या मालिकेत आणखी एक नाव जोडले गेले आहे अनुभवी खेळाडू डेव्हिड मिलर सोमवारी 27 जानेवारी रोजी दक्षिण आफ्रिका २० च्या चालू हंगामात डरबन सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यादरम्यान जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
डावाच्या १४व्या षटकात डेव्हिड मिलर कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षण करत असताना शॉट थांबवण्याच्या प्रयत्नात तो जखमी झाला. यानंतर मिलरने रॉयल्सच्या सपोर्टिंग स्टाफसह मैदान सोडले. सावधपणे पायऱ्या चढून तो चेंजिंग रूममध्ये गेला. सामन्यानंतर, मिलरने उघड केले की तो कंबरेच्या ताणाने मैदान सोडले होते. या दुखापतीच्या संदर्भात मिलर म्हणाला की, “माझ्या पाठीत थोडा कडकपणा आहे,” मिलर म्हणाला. तो थोडासा ताणून धरला आहे. परिस्थिती बिघडू नये म्हणून मी यावेळी विश्रांती घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर लुंगी एनगिडीलाही सलग चौथा सामना खेळता आलेला नाही. अशा परिस्थितीत त्याच्या फिटनेसवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
South Africa’s injury watch ahead of the Champions Trophy has grown after David Miller left the field in Paarl Royals’ final home game, while Lungi Ngidi missed his fourth consecutive match 👀 https://t.co/ZOyKWnRwVZ
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) January 27, 2025
एन्रिक नॉर्खिया पाठीच्या दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडला आहे. त्याचबरोबर जेराल्ड कोएत्झी यांनाही हॅमस्ट्रिंगच्या समस्येने ग्रासले आहे. याशिवाय नांद्रे बर्जर, लिझाड विल्यम्स, डॅरिन डुपाव्हिलॉन, विआन मुल्डर आणि ओटनीएल बार्टमन हेही जखमी झाले आहेत. अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेसाठी काही कमी अडचणी उरल्या नाहीत.
टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी जोर्झी, मार्को जॅनसेन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, लुंगी एनगिडी, एनरिक नोर्खिया, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रासेन ड्युसेन .