हेनरी क्लासेनचा व्हिडिओ व्हायरल (फोटो- ट्विटर)
हेनरी क्लासेन चाहत्यावर भडकला
एसआरएचच्या फलंदाजीत महत्वपूर्ण योगदान
क्लासेनचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल
SRH Henrich Klassen Video: हेनरी क्लासेन हा एसआरएचचा प्रमुख फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये एसआरएचसाठी काही महत्वाच्या खेळी केल्या आहेत. त्याच्यामुळे अनेक सामन्यात एसआरएच विजयी झाला आहे. मात्र सध्या हेनरी क्लासेनचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यात तो एका चाहत्यावर भडकलेला दिसत आहे.
मैदानात आपल्या फटकेबाजीने गोलंदाजांच्या नाकी नऊ आणणारा दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज हेनरिक क्लासन सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. मैदानाबाहेर एका चाहत्याने क्लासेनच्या कुटुंबाचा व्हिडिओ करत असणाऱ्या एका चाहत्यावर तो भडकला आहे. याकहा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
प्रकरण काय?
या व्हिडिओमध्ये असे दिसून येत आहे की, एक चाहता क्लासेनच्या कुटुंबाच्या जवळ जाण्याचा तसेच त्यांचा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करत आहे यामुळे हेनरी क्लासेन त्या चाहत्यावर भडकला. त्याने मागे वळून त्या व्यक्तीला कडक शब्दांमध्ये सुनावले. पुन्हा माझ्या कुटुंबाच्या वाटेला आलास, तर तुला जमिनीवर आपटेन,” असा इशारा क्लासेनने दिला. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी तातडीने मध्यस्थी केली आणि क्लासनला तिथून सुरक्षितपणे बाहेर काढले.
Heinrich Klaasen, SRH batsman got angry at a guy who was taking his photos along with his family in Hyderabad Mall. Bro literally said “Will be on the floor, if I see you clicking my photo again” 😲 It's pretty justifiable, In western countries or cultures to be precise they… pic.twitter.com/o8N71PkVy5 — Chota Don (@choga_don) May 1, 2026
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर क्रिकेट चाहत्यांनी हेनरिक क्लासनचे समर्थन केले आहे. कोणताही खेळाडू असला तरी त्यांच्या कुटुंबाचा आदर राखला गेला पाहिजे. चाहत्यांच्या अशा वर्तणुकीमुळे खेळाडूंच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
RR Vs DC Live: रियान परागचा दिल्ली कॅपिटल्सला धक्का; टॉस जिंकून थेट घेतला ‘हा’ निर्णय
Virat Kohli पुन्हा वादात!
काल गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्सने आरसीबीवर विजय मिळवला आहे गुजरातने पराभवाचा बदला घेतला आहे. मात्र आता या सामन्यातील विराट कोहलीचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यात तो चौथ्या अंपायरशी रागात बोलताना दिसून येत आहे.
It’s heating up in Ahmedabad! 🔥#JasonHolder caught #RajatPatidar at the boundary, but the #RCB camp wasn’t convinced with the decision! 👀#TATAIPL 2026 ➡️ #GTvRCB | LIVE NOW 👉https://t.co/K8vuSzrZ1d pic.twitter.com/GwfAoIelDj — Star Sports (@StarSportsIndia) April 30, 2026
चाहत्यांना रोज आयपीएलमध्ये रोमांचक सामने पाहायला मिळत आहे. त्यासोबत खेळाडूंचा आक्रमकपणा दिसून येत आहे. नुकत्याच झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा फलंदाज रजत पाटीदार याच्या कॅचवरून मोठा वाद निर्माण झाला. यावरून विराट कोहली चौथ्या अंपायरशी भिडल्याचे दिसून आले. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. आरसीबी प्रथम फलंदाजी करत असताना कर्णधार रजत पाटीदारने एक मोठा फटका मारला जो फील्डरने सीमारेषेजवळ पकडला. हा कॅच घेताना फील्डरचा पाय सीमारेषेला लागला आणि कॅच पकडल्यावर बॉल ग्राऊंडवर लागला यावर संभ्रम निर्माण झाला.






