एसआरएचने बदलला कर्णधार (फोटो- ians)
पॅट कमिन्स दुखापतीमधून झाला फिट
इशान किशन ऐवजी कमिन्स असणार कर्णधार
एसआरएच मॅनेजमेंटचा मोठा निर्णय
Pat Cummins Vs Ishan Kishan: आयपीएलचा थरार सुरू झाला. चाहत्यांना रोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. अनेक नवनवीन रेकॉर्डस , विक्रम आपल्याला बघायला मिळत आहे. मात्र यंदाच्या हंगामात चर्चा सुरू झाली आहे ती एसआरएचच्या निर्णयाची. एसआरएचचा संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असताना मॅनेजमेंटने (IPL 2026) कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. एसआरएचने हा निर्णय अधिकृतरित्या जाहीर केला आहे.
विजयी कर्णधाराला डच्चू का?
हैदराबादच्या संघाने गेल्या काही सामन्यात उत्तम खेळी करत विजय मिळवला आहे. पूर्ण संघ विजय प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील आहे. ईशान किशनच्या नेतृत्वाखाली संघाने प्रतिस्पर्ध्यांना चारी मुंड्या चीत केले आहे. विजय मिळवूनही ईशानला कर्णधारपदावरून हटवण्यात आल्याने चाहत्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मॅनेजमेंटने यावर स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, “हा निर्णय केवळ एका सामन्याच्या निकालावर आधारित नसून, संघाच्या दीर्घकालीन रणनीतीचा एक भाग आहे.”
Vastunnadu 🧡🔥 pic.twitter.com/9ZzYaR1fGK — SunRisers Hyderabad (@SunRisers) April 24, 2026
आता ‘हा’ खेळाडू सांभाळणार धुरा
ईशान किशनच्या जागी आता पुन्हा एकदा पॅट कमिन्स एसआरएचचे नेतृत्व सांभाळणार आहे. यावर शिक्कामोर्तब झाले आहे. व्यवस्थापनाने स्पष्ट केले की, ईशान किशन हा संघाचा मुख्य घटक असून तो खेळणारच आहे. मात्र आता कर्णधार म्हणून पॅट कमिन्स मैदानात दिसणार आहे.
बातमी अपडेट होत आहे…






