फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans 1st innings report : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये सामना सुरू आहे. या सामन्यामध्ये आणखी एकदा सनरायझर्स हैदराबादचे फलंदाज फेल ठरले आहेत. गुजरात टायटन्सचे गोलंदाज मोहम्मद, साई किशोर आणि प्रसिद्ध कृष्णा सारख्या गोलंदाजांसमोर त्यांची एकही चालली नाही. मागील तीन सामन्यांपासून हैदराबादच्या खेळाडूंनी अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. या सामन्यात हैदराबादने गुजरात टायटन्ससमोर १५३ धावांचे लक्ष्य उभे केले आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वात गुजरात टायपिंगचा संघाने दमदार खेळ दाखवला.
हैदराबादच्या फलंदाजी बद्दल बोलायचे झाले तर संघाचे दोन्हीही सलामी वीर फलंदाज ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा हे दोघेही मोठी कामगिरी करण्यात अपयशी ठरले. ट्रॅव्हिस हेडने या सोमनाथ पाच चेंडूंमध्ये आठ धावा केल्या तर अभिषेक शर्माने १६ चेंडूंमध्ये १८ धावा केल्या. ईशान किशन देखील संघासाठी मोठी कामगिरी करू शकला नाही. नितेश कुमार रेड्डीने या सामन्यात ३४ चेंडूंमध्ये ३१ धावा केल्या. तर हेनरिक क्लासने १९ मध्ये २७ धावा केल्या. अनिकेत वर्माने या सामन्यात १४ चेंडूंमध्ये १८ धावा केल्या तर कमिंडू मेंडिस काही विशेष कामगिरी करू शकला नाही. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स यांनी २२ धावा केल्या यामध्ये त्यांनी एक षटकार आणि तीन चौकार मारले.
Innings Break
Comprehensive bowling display from @gujarat_titans 👏
They restrict #SRH to 152/9. 🎯
Stay tuned for the chase 🫵
Scorecard ▶ https://t.co/Y5Jzfr6Vv4#TATAIPL | #SRHvGT pic.twitter.com/ZcO4NP4BJF
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2025
गुजरात टायटन्सच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने या सामन्यात कौतुकास्पद कामगिरी केली. त्याने या सामन्यात चार ओव्हर टाकले आणि १७ धावा देत चार विकेट्स नावावर केले. तर प्रसिद्ध कृष्णाने संघासाठी दोन विकेट्स घेतले त्याचबरोबर साई किशोरने संघासाठी दोन विकेटची कमाई केली. ईशान शर्मा आणि राशिद खान याच्या हाती एकही विकेट लागला नाही.
गुजरात टायटनच्या फलंदाजीचा विचार केला तर साई सुदर्शन आणि शुभमन गिल दमदार फॉर्ममध्ये आहेत. आज दोन्ही सलामीवीर फलंदाजांच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असेल त्याचबरोबर जोस बटलरने मागील दोन सामन्यांमध्ये अर्धशतकीय खेळी खेळली आहे. जर या फलंदाजांची बॅट चालली तर सामना एकतर्फी गुजरात टायटनच्या नावावर होईल असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आज वॉशिंग्टन सुंदरला संघामध्ये स्थान मिळाले आहे.