फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Update on Rohit Sharma’s injury : लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर होता. त्याला दुखापत झाली होती त्यामुळे तो सामना खेळू शकला नाही. लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईच्या संघाने या स्पर्धेमध्ये काही कामगिरी केली नाही. हिटमॅनच्या अनुपस्थितीत, विल जॅक्सने मुंबई इंडियन्ससाठी सलामी दिली. तथापि, आता हिटमनच्या दुखापतीबद्दल एक मोठी अपडेट आली आहे. मुंबईच्या प्रशिक्षकांनी रोहित शर्माच्या फिटनेसवर मोठा खुलासा केला आहे.
मुंबई इंडियन्स ७ एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सामना खेळणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी मुंबईसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. खरंतर, एमआय प्रशिक्षकांनी रोहित शर्माच्या फिटनेसबद्दल एक मोठी अपडेट शेअर केली आहे. प्रशिक्षकांच्या मते, रोहित शर्मा पूर्णपणे ठीक दिसत आहे. त्याने आज चांगली फलंदाजीही केली. आता रोहित शर्मा तंदुरुस्त झाला आहे, त्यामुळे त्याचे खेळणे देखील नैसर्गिक मानले जाते. एलएसजी विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला होता.
ROHIT SHARMA UPDATE 📢
– MI Coach confirmed Rohit Sharma looks good, he will bat today. [Devendra Pandey/Press] pic.twitter.com/U1IexcfYfN
— Johns. (@CricCrazyJohns) April 6, 2025
आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत मुंबईने ४ सामने खेळले आहेत. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे या सर्व सामन्यांमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करू शकला नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या पाचव्या कसोटी सामन्यादरम्यान जस्सीला पाठीला दुखापत झाली. यानंतर तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. जस्सीने भारतीय संघासाठी २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भाग घेतला नव्हता. तथापि, आता तो मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील होण्यास सज्ज आहे. बुमराहला आरसीबीविरुद्ध संधी मिळते की नाही हे पाहणे मनोरंजक असेल.
मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करण्यात आली आहे. यामध्ये जसप्रीत बुमराहचे पुनरागमन झालेची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सचे चाहते आता जसप्रीत बुमराहला पुन्हा खेळताना पाहण्यात प्रचंड उत्सुक आहेत.
Singing 🎶 “Naaaaaaant’s Ingonyama Bagithi Baba!” 🎶 in the background 🦁#MumbaiIndians #PlayLikeMumbai #TATAIPL #MIvRCB pic.twitter.com/g9aVsorOhj
— Mumbai Indians (@mipaltan) April 6, 2025
रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, टिळक वर्मा, मिचेल सँटनर, जसप्रीत बुमराह, अश्वनी कुमार, विघ्नेश पुथूर, ट्रेंट बोल्ट.