फोटो सौजन्य - SunRisers Hyderabad/Mumbai Indians सोशल मीडिया
Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर सामना खेळवला जाणार आहे. पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स पुन्हा फॉर्ममध्ये आला आहे. विजयांची हॅटट्रिक साजरी केल्यानंतर, एमआयचे मनोबल आता पूर्णपणे उंचावले आहे. आयपीएल २०२५ मधील त्यांच्या पुढील सामन्यात, संघाचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होईल. या १८ व्या सीझनमधील दोन्ही संघांमधील हा दुसरा सामना असेल. पहिल्या सामन्यात हार्दिक पंड्याच्या सैन्याने एसआरएचचा ४ गडी राखून पराभव केला.
दुसरीकडे, हैदराबादच्या संघ या सीझनमध्ये फार काही विशेष कामगिरी करू शकला नाही. हा सिझन हैदराबादच्या संघासाठी दुःस्वप्नापेक्षा कमी राहिला नाही. SRH संघाने आतापर्यत ७ पैकी ५ सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. तुमच्या ड्रीम टीममधील संघात तुम्हाला यशस्वी बनवू शकणारे ते अकरा खेळाडू कोण आहेत ते आम्ही तुम्हाला सांगतो.
यष्टीरक्षक म्हणून हेनरिक क्लासेन आणि रायन रिकेलटन हे सर्वोत्तम पर्याय असतील. हैदराबादसाठी चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या फलंदाजांपैकी क्लासेन हा एक आहे. मागील सामन्यात क्लासेनने चांगली खेळी खेळली होती त्याने २८ चेंडूत ३७ धावांची शानदार खेळी केली. रिकेल्टन बॅटनेही कहर करू शकतो. तुम्ही ग्रँड लीगमध्ये रिकेल्टनला कर्णधार म्हणून देखील वापरून पाहू शकता.
ट्रॅव्हिस हेड, अनिकेत वर्मा, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा हे सर्वोत्तम पर्याय असतील. रोहितने त्याचा गमावलेला फॉर्म परत मिळवला आहे आणि आता कोणत्याही गोलंदाजाला त्याला रोखणे सोपे जाणार नाही. गेल्या सामन्यातही सूर्याने शानदार खेळी केली. जर ट्रॅव्हिस हेडची बॅट बोलली तर तो तुम्हाला खूप गुण देऊ शकतो. कर्णधार म्हणून तुम्ही ट्रॅव्हिस हेड किंवा हिटमॅन म्हणजेच रोहित शर्मावर विश्वास दाखवू शकता.
MI Paltan have arrived in Hyderabad for their clash against SRH on Wednesday 🏏🔵
📸: Mumbai Indians #SRHvMI #CricketTwitter pic.twitter.com/jRiCpm9xge
— InsideSport (@InsideSportIND) April 22, 2025
तुम्ही कोणत्याही परिस्थितीत तुमच्या स्वप्नातील संघातून अभिषेक शर्माला दुर्लक्षित करू शकत नाही. अभिषेक जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याचबरोबर हार्दिक पांड्या फलंदाजी आणि चेंडू दोन्हीतून चांगली कामगिरी करू शकतो. तुम्ही हार्दिकला उपकर्णधाराची जबाबदारी देऊ शकता.
गोलंदाजीत तुम्ही पॅट कमिन्स आणि जसप्रीत बुमराहवर विश्वास ठेवू शकता. गेल्या सामन्यात बुमराह चांगल्या लयीत दिसला. जर जस्सीची जादू चालली तर तोच तुम्हाला मजा देऊ शकतो. कमिन्स फलंदाजी आणि चेंडूनेही महत्त्वाचे योगदान देऊ शकतो.
यष्टिरक्षक- हेनरिक क्लासेन, रायन रिकेल्टन
फलंदाज- ट्रॅव्हिस हेड, अनिकेत वर्मा, रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा
अष्टपैलू- अभिषेक शर्मा (उपकर्णधार), हार्दिक पंड्या
गोलंदाज- पॅट कमिन्स, जसप्रीत बुमराह