फोटो सौजन्य - Rajasthan Royals सोशल मीडिया
राजस्थान रॉयल्स : इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा हा सिझन फारच मनोरंजक होत चालला आहे. सध्या या सीझनमध्ये अनेक क्रिकेट चाहत्यांना मनोरंजक सामने पाहायला मिळत आहेत. आज आयपीएल २०२५ चा ४० वा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये रंगणार आहे. सध्या आयपीएल २०२५ च्या मॅच फिक्सिंग संदर्भात एक विधान सोशन मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चत आहे हे प्रकरण सविस्तर वाचा.
राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या तदर्थ समितीचे निमंत्रक जयदीप बिहाणी यांच्या विधानावरुन गदारोळ झाला आहे. राजस्थान रॉयल्सचा लखनौविरुद्धचा सामना निराशाजनक झाल्यानंतर, जयदीपने एका निवेदनात अप्रत्यक्षपणे संघावर मॅच फिक्सिंगचा आरोप केला. मात्र, जयदीपच्या या विधानामुळे राजस्थान रॉयल्स संघ व्यवस्थापन संतापले आहे. आयपीएल फ्रँचायझीने याबद्दल राजस्थानचे मुख्यमंत्री, क्रीडा मंत्री आणि क्रीडा सचिवांकडे तक्रार केली आहे. राजस्थान रॉयल्सने जयदीप बिहाणीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
The Rajasthan Cricket Association (RCA) has accused the Rajasthan Royals of match-fixing following their unexpected defeat to the Lucknow Super Giants (LSG). The RCA has initiated an investigation into the matter. #RajasthanRoyals #RCA #MatchFixingAllegation #LSG#CSK #MI… pic.twitter.com/WKqiaOzU0x
— Monish (@Monish09cric) April 22, 2025
जयदीप बिहानीने राजस्थान रॉयल्सविरुद्ध केलेले मॅच फिक्सिंगचे आरोप पूर्णपणे मूर्खपणाचे असल्याचे संघ व्यवस्थापनाने म्हटले आहे. राजस्थान संघाचे वरिष्ठ अधिकारी दीप रॉय म्हणाले की, बिहानी यांनी संघावर केलेले आरोप निराधार, बकवास आणि खोटे आहेत. त्यांनी सांगितले की याचा कोणताही पुरावा नाही. न्यूज १८ शी बोलताना, बिहानी यांनी लखनौविरुद्ध राजस्थानच्या २ धावांनी झालेल्या पराभवावर प्रश्न उपस्थित केले होते. तो म्हणाला की सामना पूर्णपणे राजस्थानच्या ताब्यात होता, मग शेवटच्या षटकात इतक्या कमी धावा करूनही संघ कसा हरला?
IPL 2025 : अरे दादा, कसला हा संताप? RR च्या फलंदाजाने करवतीने बॅटच कापली..,पहा Video
राजस्थान रॉयल्स व्यवस्थापनाने एक निवेदन जारी करून हे सर्व आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले, “अॅड-हॉक समितीच्या संयोजकांनी केलेले सर्व आरोप आम्ही पूर्णपणे फेटाळून लावतो. जनतेसमोर केलेली अशी विधाने केवळ दिशाभूल करणारी नाहीत तर राजस्थान रॉयल्स, राजस्थान क्रीडा परिषद आणि बीसीसीआयची प्रतिमा देखील खराब करतात.”
राजस्थानला एका चुरशीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. लखनौविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात सामना पूर्णपणे राजस्थान रॉयल्सच्या हातात दिसत होता. शेवटच्या षटकात संघाला विजयासाठी फक्त ९ धावांची आवश्यकता होती आणि शिमरॉन हेटमायर आणि ध्रुव जुरेल ही जोडी क्रीजवर उपस्थित होती. तथापि, आवेश खानच्या शानदार गोलंदाजीमुळे राजस्थानला लक्ष्यापासून २ धावांनी कमी पडावे लागले आणि लखनौने रोमांचक सामना जिंकण्यात यश मिळवले.