यूएई : यूएई मध्ये सुरु असलेल्या आशिया कप (Asia Cup) स्पर्धेत काल बांग्लादेश विरुद्ध श्रीलंका (Bangladesh Vs Shri lanka) असा क्रिकेट सामना पार पडला. यासामन्यात श्रीलंकेने बांग्लादेशला धूळ चारत सामना खिशात घालून थेट सुपर ४ मध्ये प्रवेश केला. मात्र विजयानंतर श्रीलंकेबच्या खेळाडूंचे वेगळे रूप स्टेडियमवर पहायला मिळाले. विजयानंतर बांग्लादेशच्या खेळाडूंना चिडवण्यासाठी श्रीलंकेच्या खेळाडूंनी मैदानात ‘नागीन डान्स’ केला. यावेळी २०१८ साली बांग्लादेश विरुद्ध झालेल्या एका पराभवाचा वचपा श्रीलंकेच्या खेळाडूंनी काढला.
They still remember the Nagin Dance ?? pic.twitter.com/h8GLsTKo2K
— Yash?? (@YashR066) September 1, 2022
शुक्रवारी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांग्लादेशने निर्धारित २० षटकांत ७ गडी गमावून १८३ धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने ४ चेंडू राखून दोन विकेट्स राखून सामना जिंकला. या सामन्यानंंतर श्रीलंकेच्या खेळाडूंनी आणि प्रेक्षकांनी बांग्लादेशला नागिन डान्स करत ट्रोल केले. २०१८ मध्ये निदाहास ट्रॉफीत बांगलादेशने २ विकेट्स राखून यजमान श्रीलंकेला स्पर्धेबाहेर केले होते आणि तेव्हा बांगालदेशच्या सर्व खेळाडूंनी मैदानावर नागिन डान्स (Nagin Dance)केला होता.