फोटो सौजन्य - ICC
India vs New Zealand final match: चॅम्पियन ट्रॉफी २०२५ आता शेवटच्या टप्प्यात आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये स्पर्धेचा फायनलचा सामना रंगणार आहे. त्यामुळे आता ७ वर्षांनंतर आयोजित करण्यात आलेल्या चॅम्पियन ट्रॉफीचे जेतेपद कोणाच्या नावावर होणार याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष्य लागले आहे. भारताचा संघ स्पर्धेमध्ये अपराजित आहे तर दुसरीकडे चॅम्पियन ट्रॉफीच्या लीग सामन्यामध्ये भारताच्या संघाने किवी संघाचा पराभव केला होता. त्यामुळे आता न्यूझीलंडचा संघ बदला घेण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
कॅप्टन Rohit Sharma ने रचला विश्वविक्रम, असा चमत्कार जो जगभरात कोणत्या कर्णधाराने केला नाही
न्यूझीलंडच्या संघाच्या फिल्डिंगबद्दल या स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झाली त्याचबरोबर त्यांनी दक्षिण आफ्रिकेला सेमीफायनलच्या सामन्यात मोठ्या फरकाने देखील पराभूत केले आहे. तर दुसरीकडे भारताच्या संघाने लीग सामन्यात एकही सामना न गमावता सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. आता भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामधील होणाऱ्या सामन्यासाठी सर्वच क्रिकेट चाहते प्रचंड उत्सुक आहेत. आता आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यामध्ये होणाऱ्या सामन्यासाठी अधिकाऱ्याच्या नांवाची घोषणा करण्यात आली आहे. ९ मार्च रोजी होणाऱ्या भारत न्यूझीलंड फायनलच्या सामन्यात पॉल रिफेल आणि रिचर्ड इलिंगवर्थ हे दोन पंच मैदानावर असणार आहेत. हे दोघेही आयसीसिच्या एलिट अंपायरचे सदस्य आहेत.
Match officials named for the #ChampionsTrophy 2025 grand finale between India and New Zealand.
Read more ➡️ https://t.co/DJob447FFq pic.twitter.com/EEQconrwC9
— ICC (@ICC) March 6, 2025
दोघांनीही उपांत्य सामन्यात अम्पायरिंग केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात इलिंगवर्थ यांनी अम्पायरिंग केली होती, तर न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या उपांत्य सामन्यात रीफेल यांनी तीच भूमिका बजावली होती. इलिंगवर्थ यांनी चार वेळा आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम पंच पुरस्कार जिंकला आहे. अलिकडेच, त्याने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक आणि २०२४ च्या टी-२० विश्वचषक अंतिम सामन्यातही पंचगिरी केली आहे. गट फेरीत भारत आणि न्यूझीलंड सामन्यातही ते पंच होते.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यासाठी तिसऱ्या अंपायरचे नावही जाहीर करण्यात आले आहे. ही भूमिका जोएल विल्सन साकारणार आहे. याशिवाय कुमार धर्मसेना चौथ्या पंचाच्या भूमिकेत असणार आहेत. या दोघांचाही आयसीसी एलिट पंचांच्या यादीत समावेश आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीतही दोघांनी महत्त्वाची जबाबदारी बजावली. यावेळी, धर्मसेना हे फील्ड पंच होते आणि जोएल विल्सन हे थर्ड पंच होते. याशिवाय रंजन मदुगले हे मॅच रेफ्रीच्या भूमिकेत असतील. तो आयसीसी मॅच रेफरी एलिट पॅनेलचा सर्वात अनुभवी सदस्य आहे.