केवळ २२ वर्षीय यासीन अयारीने सामन्याच्या सातव्या मिनिटाला सुमारे २० यार्डांवरून जबरदस्त शॉट मारत स्वीडनला आघाडी मिळवून दिली. ट्युनिशियाच्या बचावपटूने केलेल्या चुकीच्या क्लिअरन्सचा अचूक फायदा घेत अयारीने चेंडू थेट गोलपोस्टमध्ये धाडला. हा या स्पर्धेतील आतापर्यंतचा येवढा आकर्षक गोल होता की प्रेक्षकही पाहून थक्क झाले. या गोलाची सध्याच्या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलांपैकी एक म्हणून गणना केली जात आहे. विशेष बाब म्हणजे, गोल केल्यानंतर अयारीने जल्लोष न करता हात वर करून ट्युनिशियन समर्थकांची जणू माफी मागितली. अयारीची कौटुंबिक मुळे ट्युनिशियाशी जोडलेली असल्याने हा क्षण अधिक भावनिक ठरला.
अझौझ अयारी यांनी अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले, ‘माझ्या मुलाला ट्युनिशियाकडून खेळायचे होते, पण मी त्याला स्वीडनचे प्रतिनिधित्व करण्यास सांगितले, कारण याच देशाने त्याला दत्तक घेऊन वाढवले आहे. त्याने या देशाला काहीतरी परत दिले पाहिजे.’ अयारीने अनेकदा आपण स्वतःला स्वीडिश मानत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीसाठी त्याने स्वीडनची निवड केली. सामन्यापूर्वी ट्युनिशियाचे प्रशिक्षक सबरी लामौसी यांनीही अयारीच्या निर्णयाचा आदर व्यक्त करत त्याच्याबद्दल कोणतीही नाराजी नसल्याचे सांगितले होते.
सामन्यापूर्वी ट्युनिशियाचे प्रशिक्षक सबरी लामौसी यांनीही यासीन अयारीच्या निर्णयाचा आदर केला होता. त्यांनी सांगितले की, अयारीबद्दल त्यांना कोणतीही तक्रार नाही आणि तो एक उत्कृष्ट खेळाडू आहे. अयारीने केवळ पहिला गोलच केला नाही, तर अतिरिक्त वेळेत आणखी एक शानदार गोल करून स्वीडनचा ५-१ असा विजय निश्चित केला. अलेक्झांडर इसाक, व्हिक्टर ग्योकेरेस आणि मॅटियास स्वानबर्ग यांनीही प्रत्येकी गोल केले.






