GT Vs RCB 2026 Final Live Streaming (फोटो- सोशल मिडिया)
अहमदाबादमध्ये थोड्याच वेळात सुरू होणार अंतिम सामना
रजत पाटीदार आणि शुभमन गिल येणार आमनेसामने
दोन्ही संघांना दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याची असणार संधी
Tata IPL 2026 GT Vs RCB Final Live Updates: आज आयपीएल 2026 चा अंतिम सामना होणार आहे. गुजरात टायटन्स अन् रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन शक्तिशाली संघांमध्ये हा अंतिम सामना होणार आहे. थोड्याच वेळा या सामन्याला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम सुरुवात होईल. पीच रिपोर्टनुसार हा सामना हाय स्कोअरिंग होऊ शकतो. नुकताच अंतिम सामन्याचा टॉस पार पडला. या आरसीबी संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आजच्या सामन्यावर पावसाचे सावट आहे. आरसीबीकडून विराट कोहली, भुवनेश्वर, रजत पाटीदार, वेंकटेश अय्यर यांच्यावर मदार असेल. टर गुजरात कडून प्रामुख्याने कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शनच्या कामगिरीवर अवलंबून असणार आहे. एका बाजूला विराट कोहली आणि रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबीचा संघ तर दुसऱ्या बाजूला शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स विजेतेपदासाठी सज्ज आहे. गतविजेता संघ पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकणार की गुजरात बाजी मारणार याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
आजचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होईल. फायनल असल्यामुळे अहमदाबादमध्ये चाहते मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. आज संपूर्ण स्टेडियम भरले जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आरसीबीकडून विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, रजत पाटीदार आणि गुजरात कडून शुभमन गिल, साई सुदर्शन, रबाडा , सिराज असे फॉर्ममध्ये असणारे खेळाडू खेळताना दिसून येतील.
आरसीबी आणि गुजरात यांच्यात आतापर्यंत ९ सामने खेळले गेले आहेत. यापैकी आरसीबीने ५ तर गुजरातने ४ सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये टक्कर अपेक्षित आहे. विशेष म्हणजे या हंगामात दोन्ही संघांनी उत्कृष्ट क्रिकेट खेळले असून अंतिम सामन्यात दबाव कोण चांगल्या प्रकारे हाताळतो यावर निकाल ठरणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: व्यंकटेश अय्यर, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), टीम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, रसिक सलाम दार, जेकब डफी.
GT च्या ‘त्या’ दुखण्यावर RCB करणार वार; IPL 2026 Final मध्ये ‘रजत’ सेना इतिहास घडवणार?
गुजरात टायटन्स : साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, राशीद खान, राहुल तेवतिया, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.






