रजत पाटीदार आणि शुभमन गिल (फोटो- सोशल मिडिया)
आजचा सामना गिल आणि पाटीदारसाठी असणार महत्वाचा
टी-20 संघासाठी बीसीसीआय कोणाला निवडणार याची उत्सुकता
अहमदाबादमध्ये आरसीबी विरुद्ध गुजरातमध्ये अंतिम सामना
Tata IPL 2026 GT Vs RCB Final Live Updates: आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर आयपीएल 2026 चा महामुकाबला होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होईल. आज आयपीएल ट्रॉफी कोणता संघ उंचवणार हे पहावे लागणार आहे. दरम्यान या सामन्यात रजत पाटीदार आणि शुभमन गिल यांच्याकडे देखील सर्वांचे लक्ष असणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्समध्ये यांच्यात आयपीएलचा अंतिम सामना होणार आहे. दरम्यान यामध्ये दनही कर्णधार रजत पाटीदार आणि शुभमन गिल यांच्या खेळीकडे लक्ष असणार आहे. त्यांच्या कामगिरीवर भारतीय टी-20 संघात कोणाला स्थान मिळणार हे कळणार असल्याचे म्हटले जात आहे.
या हंगामात रजत पाटीदार आणि शुभमन गिलने शानदार कामगिरी केली आहे. आपल्या जबरदस्त फलंदाजीने त्यांनी रन्सचा पाऊस पडला आहे. आगामी आंतरराष्ट्रीय टी-२० मालिका पाहता, निवड समिती या दोघांच्या कामगिरीवर बारीक लक्ष ठेवून आहे. या फायनलमधील खेळी कोणाचे नशीब उघडणार, याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.
GT च्या ‘त्या’ दुखण्यावर RCB करणार वार; IPL 2026 Final मध्ये ‘रजत’ सेना इतिहास घडवणार?
सध्या मी कोणत्याही निवडीचा विचार करत नाहीये. माझे संपूर्ण लक्ष केवळ आजच्या होणाऱ्या अंतिम सामन्यावर आहे. माझ्या संघाला विजयी करणयावर माझे लक्ष केंद्रित झाले आहे. भविष्यात काय होईल त्याचा विचार करून मी सध्या अंतिम सामन्यावर दुर्लक्ष करू इच्छित नाही, असे कर्णधार रजत पाटीदारने स्पष्ट केले आहे.
GT च्या ‘त्या’ दुखण्यावर RCB करणार वार
आजचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होईल. फायनल असल्यामुळे अहमदाबादमध्ये चाहते मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. आज संपूर्ण स्टेडियम भरले जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आरसीबीकडून विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, रजत पाटीदार आणि गुजरात कडून शुभमन गिल, साई सुदर्शन, रबाडा , सिराज असे फॉर्ममध्ये असणारे खेळाडू खेळताना दिसून येतील.
गुजरातची दुखती नस कोणती?
आयपीएल 2026 मध्ये गुजरात टायटन्सचे प्रमुख खेळाडू सोडल्यास फलंदाजीत संघ अपयशी ठरला आहे. गुजरातचा डोलारा केवळ कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन या जोडीवर अवलंबून असल्याचे दिसून आले. मात्र त्यांच्यानंतर कोणत्याही फलांडाजाने साजेशी खेळी केळली नाहीये. हा गुजरातसमोरचा मोठा धोका आहे.






