(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
प्रेमाचा नवीन पदर उलगडताना ट्रेलरमध्ये इशान आणि नेत्राच्या प्रवासातील भावनिक वळण पाहायला मिळते. एकीकडे त्यांचे प्रेम फुलायला लागते मात्र नियतीच्या कल्पना निराळ्या असतात. नेत्रा एक नवीन जीवन सुरू करताना दिसते आणि सुमेरच्या रुपाने तिला नवीन प्रेम लाभते. तिला परत आपल्या जीवनात आणण्याचा निर्धार करून, इशान तिचा पाठलाग करतो. परंतु गोष्टी पूर्वीसारख्या सोप्या राहत नाहीत, नवीन समीकरणे तयार होऊ लागतात. जे उलगडते ते प्रेम, गोंधळ आणि बदलत्या बंधांचे मिश्रण! जिथे भूतकाळ दफन होण्यास तयार नसतो.
हाय-व्होल्टेज डान्स फेस-ऑफ, स्लो-बर्न स्पर्धा आणि पार्श्वभूमीत बंदिस्त होण्यास नकार देणारे एक रहस्य, हा सीझन केवळ अपेक्षा वाढवणारा नाही तर कथेची पकड घट्ट करतो. रहस्ये गळून पडू लागतात, निष्ठा पूर्वीसारखी टिकत नाहीत आणि ओळखी अस्पष्ट होऊ लागतात. ज्यामुळे कथा प्रेम आणि रहस्यमयतेच्या गर्तेत ओढली जाते. सर्व गोंधळ आणि निर्विवाद केमिस्ट्रीमध्ये, एक प्रश्न शांतपणे डोकं वर काढतोः नेत्राला आयुष्यात परत आणण्यासाठी इशानचे प्रेम पुरेसे ठरेल का?
अॅमेझॉन एमएक्स प्लेअरचे हेड ऑफ कंटेंट, अमोघ दुसाद यांनी सांगितले, “कॅम्पस बीट्स ही आमच्यासाठी तरुण प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरलेली आणि सर्वाधिक काळ सुरू असलेली फ्रँचायझी आहे. या नव्या पर्वात आम्ही भावनांची अधिक सखोलता, जोशपूर्ण नृत्य आणि आत्ताच्या प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारे अनपेक्षित वळण यांचा सुरेख मेळ साधत आमच्या सादरीकरणाच्या कक्षा आणखी विस्तारल्या आहेत. हा नवीन सीझन प्रेक्षकांसमोर सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे आणि तो प्रेक्षकांना अॅमेझॉन एमएक्स प्लेयरवर विनामूल्य पाहता येईल.”
नवीन सिझनबद्दल बोलताना शांतनु माहेश्वरी म्हणाले, “नृत्य माझ्या मनाच्या खूप जवळचं आहे, आणि कॅम्पस बीट्स मुळे मला गेल्या काही वर्षांत ते साजरं करण्याची एक हक्काची जागा दिली आहे. या सिझनमध्ये इशानचा प्रवास अधिक अंतर्मुख आहे. तो एका अशा गोष्टीला धरून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, जी दुसऱ्या व्यक्तीसाठी आता अस्तित्वातच नाही. ही असमतोल परिस्थिती सगळंच बदलून टाकते त्याची झुंज बाहेरून शांत वाटते, पण आतून ती अधिक तीव्र बनते.”
श्रुती सिन्हा म्हणाल्या, “कॅम्पस बीट्सच्या सहाव्या सिझनसह अॅमेझॉन एमएक्स प्लेअरवर परतताना खूपच छान वाटत आहे. या सिझनमध्ये नेत्राचा प्रवास स्वतःला नव्याने शोधण्याचा आहे, पण तो सरळ किंवा सहजसाध्य नाही. तिच्या मनात संभ्रम आहे, अंतर्मनाचे संकेत आहेत आणि काही अशा अपूर्ण जाणिवा आहेत ज्या ती पूर्णपणे समजू शकत नाही. यावेळी मला या पात्राकडे अगदी वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावं लागलं. ते आव्हानात्मक होतंच, पण त्याचबरोबर खूप रोमांचकही होतं.”
या सिझनमध्ये फ्रँचायझीत सहभागी झालेल्या पारस कलनावत यांनी सांगितले, “कॅम्पस बीट्ससारख्या लोकप्रिय युवा फ्रँचायझीचा भाग होण्याचा अनुभव खरोखरच विलक्षण आहे. या शोची भव्यता, कथानक मांडण्याची शैली आणि त्यातील एनर्जी या सगळ्यालाच तोड नाही. या सिझनचा भाग असल्याचा मला खूप आनंद आहे, आणि प्रेक्षकांनी तो अॅमेझॉन एमएक्स प्लेअरवर विनामूल्य पाहावा, याची मला आतुरता आहे.”
स्पर्धा तीव्र होत असताना, प्रेम फुलत असताना आणि रहस्ये उलगडण्यासाठी तयार असताना, कॅम्पस बीट्स रिटर्न्सचा प्रीमियर 29 एप्रिल 2026 रोजी होणार आहे. ही सिरीज केवळ अॅमेझॉन एमएक्स प्लेयरवर विनामूल्य प्रसारित केली जाईल, जी मोबाइल डिव्हाइसेस, कनेक्टेड टीव्ही, अॅमेझॉन शॉपिंग अॅप, प्राइम व्हिडिओ, फायर टीव्ही, जिओ टीव्ही आणि एअरटेल एक्सस्ट्रीमवर उपलब्ध असेल.






