MI Vs LSG Live Streaming (फोटो - सोशल मिडिया)
रोहित शर्मा खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष
मुंबई आणि लखनौचा संघ येणार आमनेसामने
वानखेडे स्टेडियमवर थोड्याच वेळात सुरू होणार सामना
Tata IPL 2026 MI Vs LSG Live Updates: थोड्याच वेळात मुंबई इंडियन्स आणि लखनौ संघात महत्वाचा सामना सुरू होणार आहे. आज आयपीएलचा 47 वा सामना असणार आहे. वानखेडे स्टेडियमवर हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंत आमनेसामने येणार आहेत. मुंबई सध्या नवव्या तर लखनौचा संघ 10 व्या स्थानावर आहे. दरम्यान आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आज सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत आहे. दरम्यान आज रोहित शर्मा देखील सामना खेळताना दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्स आणि लखनौच्या संघाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मुंबई इंडियन्ससध्या हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळत आहे. मात्र कर्णधार हार्दिक पंड्या , जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादवला साजेशी खेळी करता आलेली नाही. तशीच काहीशी परिस्थिती लखनौच्या संघात पाहायला मिळत आहे.
IPL 2026 Points Table: लागोपाठ दोन पराभवानंतरही PKBS टॉपवर, Mumbai Indians प्लेऑफच्या रेसमधून बाहेर
पिच रिपोर्ट
पॉईंट्स टेबलमध्ये हे दोन्ही संघ तळाला आहेत. मुंबई इंडियन्सचे होम ग्राऊंड असलेले वानखेडेचे पीच हे फलंदाजांसाठी नंदनवन समजले जाते. येथील पीच हे लालमातीचे आहे. यामुळे बॉल चांगल्या पद्धतीने बॅटवर येतो. त्यामुळे या स्टेडियमवर आज रन्सचा पाऊस पडू शकतो.सुरुवातीच्या काही ओव्हर्समध्ये वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. मोहम्मद शामी, जसप्रीत बुमराहसारख्या वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. सामना सुरू होऊन काही वेळ झाला की, स्पिनर्सना मदत मिळू शकते. रात्रीचया वेळेस या ठिकाणी दव पडू शकते. त्यामुळे टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय कर्णधार घेण्याची शक्यता आहे.
मुंबई इंडियन्सला आपल्या घरच्या मैदानावर विजयाची नोंद करण्याची मोठी संधी आहे, तर दुसरीकडे लखनऊचा संघ पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. मुंबई इंडियन्ससाठी हा सामना केवळ एक खेळ नसून स्पर्धेत टिकून राहण्याची शेवटची संधी आहे. टॉप 4 मध्ये आणि प्ले ऑफमध्ये जाण्याची संधी मुंबई इंडियन्सने जवळपास गमावली आहे. हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सला यश मिळवून देण्यात सपशेल अपयशी ठरला आहे. दुसरीकडे लखनौचा संघ देखील शेवटच्या स्थानी आहे. आजचा सामना जिंकून थोडीशी आघाडी घेण्याचा प्रयत्न लखनौचा संघ करताना दिसेल. कर्णधार ऋषभ पंतला साजेशी कामगिरी अद्याप करता आलेली नाही.
MI Vs LSG Pitch Report: आजची लढाई ‘अस्तित्वासाठी’; पहा वानखेडेचा स्पेशल पीच रीपोर्ट
मुंबई इंडियन्सची संभाव्य टीम: रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), विल जॅक्स, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, क्विंटन डी कॉक, दानिश मालेवार.
एलएसजीची टीम: जोश इंग्लिश, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), निकोलस पूरन, एडेन मार्करम, आयुष बदोनी, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, मयंक यादव / मोहसीन खान, शाहबाज अहमद / अर्शीन कुलकर्णी.






