केकेआरच्या संघाला मोठा धक्का (फोटो - ians)
केकेआरला शेवटच्या सामन्याआधी मोठा धक्का
केकेआर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना
अंगरीक्ष रघुवंशी दुखापतीमुळे बाहेर
Tata IPL 2026 KKR Updates: उद्या म्हणजेच आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील शेवटचे साखळी सामने होणार आहेत. उद्याचा आयपीएलचा शेवटचा डबल हेडर असणार आहे. उद्या केकेआरविरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. मुंबई सोडून तिन्ही संघांसाठी सामना महत्वाचा असणार आहे. मात्र सामना होण्याआधी केकेआरला मोठा धक्का बसला आहे.
राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात अद्याप प्ले ऑफची लढाई सुरू आहे. मात्र केकेआर उद्या दिललीविरुद्ध खेळणार आहे. मात्र केकेआरच्या अडचणी वाढल्या आहेत. केकेआरचा इन फॉर्म फलंदाजी आणि विकेटकिपर असलेला अंगरीक्ष रघुवंशी उद्याच्या सामन्यात खेळू शकणार नाहीये.
अंगरीक्ष रघुवंशी दुखापतीमुळे आयपीएल 2026 मधून बाहेर पडला आहे. केकेआरने आपल्या अधिकृत अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे. रघुवंशीच्या बाहेर गेल्याने केकेआरला मोठा धक्का समजला जात आहे.केकेआरने आपल्या अकाऊंटवर म्हटले आहे की, अंगरीक्ष रघुवंशीच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. तसेच त्याच्या डोक्याला देखील दुखापत झाल्याचे निदान झाले आहे. 20 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळताना ही दुखापत झाल्याचे समोर आले आहे.
झेल सुटला अन् हार्दिकचा पारा चढला, BCCI ची मोठी कारवाई; MI Vs KKR सामन्यात नेमकं काय घडलं?
रघुवंशी बाहेर गेल्याने केकेआरच्या अडचणी वाढल्या आहेत. तो केकेआरचा विकेटकिपर देखील होता. केकेआरसाठी त्याने यंदाच्या हंगामात नियमित रन्स केल्या आहेत. 21 वर्षीय रघुवंशीने 13 सामन्यांमध्ये 5 अर्धशतक लगावले आहेत. त्याने आतापर्यंत 422 रन्स केल्या आहेत. त्याकहा यंदाचा 82 नाबाद हा सर्वाधिक स्कोअर आहे.
केकेआरचा उद्याचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. दोन्ही संघांसाठी सामना महत्वाचा असणार आहे. मात्र अंगरीक्ष रघुवंशी खेळणार नसल्याने केकेआरच्या अडचणी वाढणार आहेत. प्ले ऑफमध्ये जायचे असेल तर उद्या केकेआरला मोठ्या फरकाने सामना जिंकावा लागणार आहे. केकेआरची यंदाच्या हंगामची सुरूवात अत्यंत खराब झाली. सलग 5 ते 6 सामने पराभूत झाल्यामुळे केकेआर पॉईंट्स टेबलमध्ये तळाशी गेले होते. मात्र त्यानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात केकेआरने चांगली कामगिरी करत प्ले ऑफच्या आशा अद्याप जिवंत ठेवल्या आहेत.






