MI Vs KKR Live Streaming (फोटो- सोशल मिडिया)
इडन गार्डन्सवर केकेआर व एमआय भिडणार
मुंबई इंडियन्सआधीच प्ले ऑफच्या बाहेर
केकेआरसाठी आजचा सामना जिंकणे अत्यंत महत्वाचे
Tata IPL 2026 KKR Vs MI Live Updates: आयपीएलमध्ये यंदाच्या हंगामात 3 संघ क्वालिफाय झाले आहेत. चौथ्या स्थानासाठी अजूनही चुरस सुरू आहे. आज कोलकतामध्ये महत्वाचा सामना होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स (IPL 2026) आमनेसामने येणार आहेत. केकेआरसाठी आजचा सामना जिंकणे अनिवार्य असणार आहे. नुकताच टॉस पार पडला. दरम्यान केकेआरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या यंदाच्या आयपीएलच्या हंगामात आरसीबी, एसआरएच आणि गुजरात टायटन्स हे संघ क्वालिफाय झाले आहेत. मात्र एकाजागेसाठी केकेआर, पंजाब, चेन्नई आणि दिल्लीच्या संघांमध्ये चुरस सुरू आहे. त्यामुळे आज केकेआरला मुंबईविरुद्ध विजय मिळवणे आवश्यक असणार आहे. कर्णधार अजिंक्य रहाणेवर मोठी जबाबदारी असणार आहे. प्ले ऑफमध्ये जायचे असल्यास केकेआरला आजचा आणि पुढील सामना जिंकावाच लागणार आहे.
आजचा पीच रिपोर्ट काय?
ईडन गार्डन्सवरील पिच फंलदाजासाठी फायदेशीर आणि अनुकूल मानली जाते. या पिचवर दव मोठी भूमिका बजावू शकतो. म्हणून नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. आयपीएल २०२६ मध्ये कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या ४ सामन्यांपैकी २ सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानी जिंकले आहेत. तर, २ सामने लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघानी जिंकले आहेत. येथे सायंकाळी तापमान ३० ते ३३ अंश सेल्सियसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. तसेच, हवामान खात्याने पावसाची दाट शक्यता वर्तवली आहे, ज्यामुळे सामन्यावर परिणाम होऊ शकतो.
मुंबई इंडियन्सचा संघ आधी प्ले ऑफच्या शर्यतीमधून बाहेर पडला आहे. दरम्यान आज सूर्यकुमार यादव खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष आहे. हार्दिक पंड्या दुखापतीमुळे खेळणार नसल्याचे समजते आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जसप्रीत बुमराह मुंबईचे नेतृत्व करण्याची शक्यता आहे.
कोलकाता नाइट रायडर्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), फिन ऍलन, अंगकृष रघुवंशी (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, मनीष पांडे, रिंकू सिंग, सुनील नरेन, अनुकुल रॉय, वरुण चक्रवर्ती, सौरभ दुबे, कार्तिक त्यागी.
IPL चा ‘बॉस’ ठरला Virat Kohli; कमाईचा आकडा वाचून फिरतील डोळे, रोहित-धोनीही पडले मागे
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), विल जॅक्स, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, रघु शर्मा






