बर्मिंगहम येथे पारपडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करून देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. ११ दिवस चाललेल्या या स्पर्धेत ७२ देशांच्या ५ हजारापेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. यंदा भारत (India) ६१ पदक जिंकून चौथ्या स्थानावर विराजमान झालेला आहे. भारताने मिळवलेल्या पदकांमध्ये २२ सुवर्णपदकं, १६ रौप्यपदकांसह २३ कांस्यपदकांचा समावेश आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेचा सांगता समारंभ (Closing ceremony) ८ ऑगस्ट रोजी पार पडला असून तो बर्मिंगहमच्या अलेक्झांडर स्टेडियममध्ये आयोजिक करण्यात आला होता. हा सांगता समरांभात अनेक रंगारंग कार्यक्रम झाले. या सांगता समारंभात बर्मिंगहमच्या इतिहासाचे अनेक पैलू दाखवण्यात आले होते. ब्रिटनचे प्रिन्स एडवर्ड यांनी २२व्या राष्ट्रकुल स्पर्धच्या सांगतेची घोषणा केली. या सांगता सोहोळ्यात राष्ट्रकुल स्पर्धेच्या सांगता समारंभात भारतीय संस्कृतीचे देखील दर्शन झाले. या सांगता समारंभात ४० पॉप बँड, अपाचे इंडियन, पंजाबी एमसी आणि डक्सी या सारख्या कलाकारांनी देखील सहभाग नोंदवला.
पंजाबी (Punjabi) एमसीच्या ‘मुंडिया तू बचके रही’ या गाण्यावर उपस्थित प्रेक्षक चांगलेच थिरकले. तर बर्मिंगहमची प्रसिद्ध रॉक स्टार ओझी ओस्बॉर्न यांनी देखील आपला जलवा दाखवला. राष्ट्रकुल स्पर्धेच्या सांगता समारंभात राष्ट्रकुल स्पर्धेचा ध्वज ऑस्ट्रेलियाकडे सोपवण्यात आला. पुढच्या राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरियामध्ये करण्यात येणार आहे. पुढची २३ वी राष्ट्रकुल स्पर्धा २०२६ मध्ये होणार आहे. यापूर्वी २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियामधील गोल्ड कोस्ट येथे २१ वी राष्ट्रकुल स्पर्धा झाली होती.