फोटो सौजन्य – X (ICC)
2025 मध्ये झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन संघांमध्ये पार पडला. यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने बाजी मारली. 2027 साठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलला नव्याने सुरुवात झाले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर संघांमध्ये कसोटी मालिकांना सुरुवात झाली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये देखील कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघ आजपासून झिंबाब्वे विरुद्ध मालिकेला सुरुवात 28 जुनपासुन होणार आहे. तर श्रीलंका आणि बांगलादेश या दोन संघांमध्ये देखील लढत सुरू आहे. श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील २ सामन्यांची कसोटी मालिका आता संपली आहे. दुसरा सामना जिंकून श्रीलंकेने मालिका १-० अशी जिंकली. दोन्ही संघांमधील पहिला सामना अनिर्णित राहिला. त्यानंतर श्रीलंकेने दुसरा सामना एक डाव आणि ७८ धावांनी जिंकला. या विजयासह, श्रीलंकेने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पॉइंट्स टेबलमध्ये आघाडी घेतली आहे.
ZIM vs SA : चॅम्पियन संघ झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेसाठी सज्ज! जाणून घ्या दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग 11
दुसऱ्या कसोटी सामन्यातील विजयासह, श्रीलंकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट्स टेबलमध्ये एका स्थानाचा फायदा घेतला आहे. यापूर्वी श्रीलंकेचा संघ चौथ्या स्थानावर होता परंतु संघ तिसऱ्या स्थानावर आला आहे. दुसरीकडे, पराभवानंतर बांगलादेश संघ चौथ्या स्थानावर घसरला आहे. या विजयासह, श्रीलंकेचे १२ गुण झाले आहेत, त्यानंतर संघाचे आता १६ गुण झाले आहेत. दुसरीकडे, बांगलादेश संघ ४ गुणांवर आहे.
Ruthless Australia needed just one session to finish off West Indies in the final innings and put first #WTC27 points on board 💪
Skipper Pat Cummins reacts to the victory 👇 https://t.co/9Zllw4WqO6
— ICC (@ICC) June 28, 2025
टीम इंडिया सध्या इंग्लंडसोबत ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिला सामना लीड्समध्ये खेळला गेला होता, ज्यामध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. ज्यामुळे टीम इंडियाला अद्याप WTC पॉइंट्स टेबलमध्ये आपले खाते उघडता आलेले नाही. टीम इंडिया सध्या १ सामना गमावल्यानंतर पाचव्या स्थानावर आहे.
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा १५९ धावांनी पराभव केला. यासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडीज विरुद्ध पहिला सामना जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाला पाॅइंट टेबलमध्ये मोठा फायदा झाला आहे, कांगारू संघ आता WTC पॉइंट्स टेबलमध्ये इंग्लंडला हरवून पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. तर इंग्लंड संघ दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.