काल आशिया कप (Asia Cup 2022) दरम्यान भारत विरुद्ध हाँगकाँग (India Vs Hongkong) यांच्यात रंगलेल्या मॅच मध्ये भारताने हाँगकाँगवर ४० धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर भारताने सुपर ४ मध्ये धडक मारली आहे. यूएईमध्ये सुरू असलेल्या सामन्यात हाँगकाँगचा पराभव झालेला असला तरी याच संघातील संघातील खेळाडूनं केलेल्या या कृत्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
Hong Kong Player Kinchit Shah Proposed His Girlfriend After The Match, And She Said YES..!!#INDvsHK pic.twitter.com/cF5eYulCEr
— Usman Ali (@Meanwhile_Maan) August 31, 2022
हाँगकाँगच्या खेळाडू किंचित शाहने (kinchit Shah)सामना संपताच आपल्या प्रेयसीला फिल्मी स्टाईलने प्रपोज केले. विशेष म्हणजे या प्रपोजनंतर त्याच्या प्रेयसीने त्याला होकारदेखील दिला. सामना संपताच किंचित थेट स्टॅड्सकडे जाण्यासाठी वळला, त्यांची गर्लफ्रेंड सामना पाहण्यासाठी तिथे बसली होती. तिच्याजवळ पोहचताच गुडघ्यावर बसला आणि तिला फिल्मी स्टाईल प्रपोज केलं. हे दृश्य पाहून हाँगकाँगची संपूर्ण टीम उत्साहाने टाळ्या वाजवत होती.
दरम्यान आजच्या सामन्यातही किंचित शाहने संघाला विजय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केला. सलामीचे फलंदाज स्वास्तात बाद झाल्यानंतर त्याने तिसऱ्या विकेटसाठी फलंदाजीला येत मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला. त्याने २८ चेंडूंमध्ये दोन चौकार आणि एक षठकार यांच्या मदतीने ३० धावा केल्या. पुढे हाँगकाँग संघाला २० षटकांत १५२ धावा करता आल्या. तर भारताचा ४० धावांनी विजय झाला.