फोटो सौजन्य - सोशल मिडिया
विजय हजारे ट्रॉफीची सुरुवात रोमांचक पद्धतीने झाली आहे. विजय हजारे ट्रॉफीच्या या स्पर्धेमध्ये भारताच्या संघामधील अनेक खेळाडू हे सहभागी झाले आहेत. त्यामुळे हे सामने पाहण्यासाठी देखील क्रिकेट चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. भारताच्या संघामधील विराट कोहली याने 15 वर्षानंतर विजय हजारे ट्राॅफीचा सामना खेळला आणि शतक झळकावले. त्याचबरोबर रोहित शर्माने देखील सामना खेळला आणि धुमाकुळ घातला. स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यांनी प्रेक्षकांचा उत्साह वाढवला होता, भारतीय संघाचे दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी आपापल्या शतकांसह रंगमंचावर आग लावली होती.
दोन्ही खेळाडूंनी त्यांच्या प्रभावी खेळीनंतर जल्लोष साजरा केला आणि आता चाहते पुन्हा एकदा त्यांच्या स्फोटक फलंदाजीची आतुरतेने वाट पाहत आहेत. स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीच्या दिल्लीचा सामना गुजरातशी होईल. हा सामना बेंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे खेळला जाईल. रोहित शर्माच्या मुंबईचा सामना जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर उत्तराखंडशी होईल. दोन्ही सामने शुक्रवारी सकाळी ९ वाजता सुरू होतील.
नीरज चोप्राच्या शाही लग्नाच्या स्वागत समारंभात हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी दिला आशीर्वाद, पहा Photo
पहिल्या सामन्यात रोहित शर्माने सिक्कीमविरुद्ध ९४ चेंडूत १८ चौकार आणि नऊ षटकारांसह १५५ धावा केल्या. दुसरीकडे, विराट कोहलीने आंध्र प्रदेशविरुद्ध १०१ चेंडूत १४ चौकार आणि तीन षटकारांसह १३१ धावा करून संघाला दमदार सुरुवात करून दिली. दरम्यान, युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीची फलंदाजी देखील लक्ष केंद्रित करेल.
We Will Telecast the Live matches of Rohit Sharma and Virat Kohli.#VijayHazareTrophy #VHT pic.twitter.com/sy2vIsVoQK — 🤍 (@diva_0387) December 26, 2025
प्लेट ग्रुपच्या सामन्यात बिहारचा सामना मणिपूरशी होईल. अरुणाचल प्रदेशविरुद्ध वैभवने १९० धावांची खेळी करून सर्वांना प्रभावित केले, ज्यामध्ये १६ चौकार आणि १५ षटकारांचा समावेश होता. त्याच सामन्यात साकिबुल गनी (१२८) आणि आयुष लोहारुका (११६) यांनी संघाच्या फलंदाजीला बळकटी दिली. रोहित शर्मा हा विजय हजारे ट्राॅफीचे दोन सामने खेळताना दिसणार आहे. त्याने पहिल्या सामन्यामध्ये कमालीची कामगिरी केली होती तर आता तो दुसऱ्या सामन्यामध्ये देखील कशी कामगिरी करणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
मध्य प्रदेश-तामिळनाडू, अहमदाबाद, सकाळी ९ वा
झारखंड-राजस्थान, अहमदाबाद, सकाळी ९ वाजता
जम्मू-काश्मीर-आसाम, राजकोट, सकाळी ९ वा
उत्तर प्रदेश – चंदीगड, राजकोट, सकाळी ९ वा
छत्तीसगड-पंजाब, जयपूर, सकाळी ९ वा
हरियाणा-सौराष्ट्र, अलूर, सकाळी ९ वा






