Vijay Hazare Trophy 2025 : विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात मुंबईचा राजाने आपला दरुद्रवतार दाखवला. सिक्कीमविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा खेळाडू रोहित शर्माने ६१ चेंडूत शतक झळकावले. प्रथम फलंदाजी करताना सिक्कीमने २३६ धावा उभ्या केल्या. प्रतिउत्तरात रोहितने अंगकृष रघुवंशीसोबत पहिल्या विकेटसाठी १४१ धावांची भली मोठी भागीदारी रचली. रघुवंशी ३८ धावांवर बाद होऊन माघारी गेला. रोहित शर्माने आपले वादळी शतक पूर्ण केले. या दरम्यान त्याने ८ षटकार आणि ९ चौकार लगावले. जयपूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या मुंबई विरुद्ध सिक्कीम सामन्यात रोहित शर्माला पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.
सिक्कीमचा कर्णधार ली योंग लेपचाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सिक्कीमने आपल्या डावाची चांगली सुरुवात केली होती. अमित राजेरा दुसऱ्या षटकात तुषार देशपांडेचा शिकार ठरला. त्यानंतर सात्विक आणि आशिष थापा यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतक (५१) महत्वाची भागीदारी रचली. थापाने ८७ चेंडूत ७९ धावा फटकावल्या. शार्दुल ठाकूरने त्याला माघारी पाठवले. त्यानंतर क्रांतीने ३४ आणि रॉबिन मनकुमार लिंबू यांनी ३१ धावा काढून महत्वाचे योगदान दिले. मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरने सहा षटकांत १९ धावा देत सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. तुषार देशपांडे, तनुष कोटियन, शम्स मुलानी आणि मुशीर खान यांनी प्रत्येकी एक बळी टिपणूयात यश मिळवले.
स्टार रोहित शर्मा जेव्हा बाद झाला तेव्हा मुंबई विजयाच्या खूप जवळ जाऊन पोहचली होती. रोहित शर्माने या डावात १६४ पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने ९४ चेंडूत १५५ धावांची खेळी केली. त्यात त्याने नऊ षटकार आणि १८ चौकार मारले. मुशीर खान २७ धावा आणि सरफराज खान ८ धावा काढून नाबाद राहिले. मुंबईने ३०.३ षटकांत २३७ धावांचे लक्ष्य गाठत ८ विकेटने शानदार विजयाची नोंद केली. मुंबईचा पुढील सामना शुक्रवार, २६ डिसेंबर रोजी उत्तराखंडविरुद्ध असेल. हा सामना जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवरही खेळला जाईल.
हेही वाचा : ICC T20 rankings : आयसीसी टी-२० क्रमवारीत भारताची दीप्ती चमकली! पहिल्यांदाच झाली अव्वलस्थानी विराजमान






