फोटो सौजन्य : X
विराट कोहली व्हिडीओ : पंजाब किंग्सचा सामना काल रॉयल चॅलंजेर्स बंगळुरू यांच्याविरुद्ध झाला या सामन्यात बंगळुरूच्या संघाने विजय मिळवून पंजाबच्या संघाला घरच्या मैदानावर पराभूत करून फायनलमध्ये स्थान पक्के गेले आहे. श्रेयस अय्यरच्या संघाला कालच्या सामन्यांमध्ये निराशाजनक कामगिरीमुळे पराभवाचा सामना करावा लागला. तर दुसरीकडे रॉयल चॅलंजेर्स बंगळुरूच्या संघाने कौतुकास्पद कामगिरी केली. या सामन्यात विराट कोहली फारच जोशात दिसला, त्याचबरोबर संघाला मोटिवेट करताना दिसला. पण आता त्याचा एक घृणास्पद कृत्य समोर आले आहे आणि त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.
आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबचा डाव पूर्णपणे कोसळला. संघाने ६० धावांच्या आत आपले ६ फलंदाज गमावले होते. यानंतर, मुशीर खानला प्रभावशाली खेळाडू म्हणून आणण्यात आले. यावेळी विराट कोहलीने मुशीर खानवर टीका केली. पंजाब किंग्जची सुरुवात खूपच खराब झाली. दुसऱ्या षटकात प्रियांश आर्य (७) बाद झाला आणि लवकरच प्रभसिमरन सिंग (१८), श्रेयस अय्यर (२) आणि जोश इंग्लिस (४) देखील बाद झाले. पॉवरप्लेमध्ये, संघाने ४ विकेट गमावल्यानंतर फक्त ४८ धावा केल्या.
IND VS ENG : T20 मालिकेसाठी भारताचा संघ जाणार इंग्लंड दौऱ्यावर, या 16 खेळाडूंना मिळाली संधी
सुयश शर्माने त्याच्या पहिल्याच षटकात दोन विकेट घेतल्या आणि किंग्जच्या उर्वरित आशा संपुष्टात आणल्या. सामन्यातील नववे षटक टाकण्यासाठी आलेल्या सुयशने दोन विकेट घेतल्या. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सुयशने शशांक सिंगला (३) बाद केले. शशांकच्या हकालपट्टीनंतर, संघाने मुशीर खानला प्रभावशाली खेळाडू म्हणून पाठवले. पहिल्या स्लिपवर उभा असलेला विराट कोहलीने इशारा केला की तोच पाणी देईल. तसेच विचारले की हे कोण आहे? जो मोठ्या सामन्यात पदार्पण करत आहे. या व्हिडिओमध्ये विराट कोहलीने मुशीर खान याला पाहून पाणी पाजण्याचं आठवण करून देत होता आणि त्याच्याकडे पाहून हसताना दिसला यावरून सध्या तो सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात ट्रॉल केले जात आहे.
“Pani Pilata Hai…” Virat Kohli making fun of 20 year old #PunjabKings player #Musheerkhan
This looks really saddening when a 20 year old is on the field batting against #RCB and being a legend for many; you make fun of him by saying “ye pani pilata h “. #shamelessViratKohli pic.twitter.com/xJe5gwQsM9— Swastika Sruti (@SrutiSwastika) May 29, 2025
समालोचक हर्षा भोगले ऑन एअर म्हणाले की, मुशीरने कोहलीला सरफराज खानची आठवण करून द्यावी. भोगले म्हणाले की, मुशीरने सांगावे की सर्फराज खान विराट कोहलीसोबत खेळला आहे. समालोचक हर्षा म्हणाला, ‘तो फक्त मागे वळून म्हणू शकतो की तू माझ्या भावाला ओळखतोस.’ त्याने भारताकडून खेळताना १५० धावा केल्या आहेत.