आशिया कप (Asia Cup) स्पर्धेचे बिगुल २७ ऑगस्ट रोजी वाजणार आहे. आशिया चषकावर नाव कोरण्यासाठी ६ संघ एकमेकांविरुद्ध क्रिकेटच्या मैदानावर भिडणार आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना हा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी (Pakistan)होणार आहे. त्यासाठी सध्या हे दोन्ही संघ कसून सराव करीत आहेत. अशातच आशिया चषकात चांगल्या खेळाचे प्रदर्शन करण्यासाठी सज्ज असणारा भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीयाने (Virat kohli) पाकिस्तानातील आपल्या एका अपंग फॅनची भेट घेतली.
विराट कोहली सराव करीत असताना पाकिस्तानातुन विराट कोहलीची मोठी चाहती असलेली एक अपंग मुलगी कोहलीला भेटण्यासाठी आली होती. विराटची भेट घेतल्यावर तिने म्हंटले की, मी विराट वगळता कोणाचीच फॅन नाही. त्याला भेटण्यासाठी मी पाकिस्तानातून आले आहे, त्याच्या सोबत एक फोटो काढायचा आहे. विराट कोहली सराव संपवून आला आणि मी त्याला भेटण्यासाठी खूप प्रयत्न केले. तो एक उत्कृष्ट क्रिकेटर असण्याबरोबरच एक उत्तम व्यक्ती देखील आहे. त्याला भेटण्याची माझी इच्छा पूर्ण झाली असून त्याने माझ्यासोबत एक फोटो देखील काढला आहे. विराट कोहलीला भेटल्यावर त्या फॅनने एका पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली आहे. सध्या सोशल मीडियावर हा प्रसंग व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून यावर अनेक सकारात्मक प्रतिक्रेया व्यक्त होत आहेत.