फोटो सौजन्य - Royal Challengers Bengaluru सोशल मीडिया
Virat Kohli Records : आयपीएल २०२५ मधील २४ वा सामना १० एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवला जाणार आहे. या हंगामात दोन्ही संघ उत्तम कामगिरी करत आहेत. दिल्लीने आतापर्यंत खेळलेल्या ३ पैकी ३ सामने जिंकले आहेत, तर आरसीबीने ४ पैकी ३ सामने जिंकले आहेत. दोन्ही संघ हंगामातील चौथ्या विजयाच्या शोधात असतील. या सामन्यात विराट कोहलीला इतिहास रचण्याची संधी असेल. अर्धशतक झळकावून हा मोठा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरेल.
जर विराट कोहलीने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले तर तो त्याच्या टी-२० कारकिर्दीत १०० अर्धशतके पूर्ण करेल. विराटच्या नावावर टी-२० मध्ये १०० अर्धशतके असतील आणि अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरेल. सध्या, टी-२० मध्ये सर्वाधिक अर्धशतके झळकावण्याच्या बाबतीत विराट जगात दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा खेळाडू डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक शतके केली आहेत. त्याने आतापर्यंत त्याच्या टी-२० कारकिर्दीत १०८ अर्धशतके केली आहेत.
GT vs RR : रियान परागच्या विकेटवर वाद! तिसऱ्या पंचाच्या वादग्रस्त निर्णयाचा ठरला बळी, पहा Video
आतापर्यंत खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२५ च्या सामन्यांमध्ये विराट कोहलीची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. त्याने खेळलेल्या पहिल्या सामन्यात केकेआरविरुद्ध अर्धशतक झळकावले. याशिवाय त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध ४२ चेंडूत ६७ धावांची खेळीही केली. किंग कोहलीने आतापर्यंत खेळलेल्या ४ सामन्यांमध्ये २ अर्धशतकेही झळकावली आहेत.
आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध विराट कोहलीने प्रभावी कामगिरी केली आहे. त्याने या संघाविरुद्ध एक हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. दिल्लीविरुद्ध विराटची बॅट चांगली चालली. हेच आकडे सांगत आहेत. त्याने दिल्लीविरुद्ध आतापर्यंत खेळलेल्या २९ सामन्यांपैकी २८ डावात ५०.३३ च्या प्रभावी सरासरीने १०५७ धावा केल्या आहेत. त्याने १० अर्धशतकेही झळकावली आहेत. या काळात कोहलीचा सर्वोच्च धावसंख्या ९९ धावा आहे.
𝘉𝘰𝘸𝘭𝘦𝘳𝘴, 𝘊𝘈𝘜𝘛𝘐𝘖𝘕 𝘈𝘏𝘌𝘈𝘋! ⚠⚡
A run-fest is loading, and these batters are here to light up the #IPLRivalryWeek fixture at the Chinnaswamy stadium! 🔥#IPLonJioStar 👉 #RCBvDC | THU, 10th APR | 6:30 PM LIVE on Star Sports 1, Star Sports 1 Hindi & JioHotstar! pic.twitter.com/s5dxAwzror
— Star Sports (@StarSportsIndia) April 10, 2025
आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरू यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. यासाठी सर्वच चाहते प्रचंड उत्सुक आहेत. या सीझनमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ मजबूत संघ आहे. दिल्लीच्या संघाने अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली या सीझनमध्ये कमालीची फलंदाजी केली आहे. त्याचबरोबर बंगळुरूच्या संघाने रजत पाटीदारच्या नेतृत्वात चांगली कामगिरी केली संघाने फक्त १ सामना गमावला आहे.