फोटो सौजन्य - सोशल मीडिया
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 : २०२५ च्या चॅम्पियन ट्रॉफीचे आयोजन कुठे केले जाणार हे एक मोठे वादाचे कारण ठरले. क्रिकेट चाहते बऱ्याच वेळेपासून २०२५ च्या चॅम्पियन ट्रॉफी पाकिस्तान मध्ये खेळवली जाणार की हायब्रीड पद्धतीने खेळवली जाणार यावर सतत प्रश्न केले जात होते. आता आयसीसीने अधिकृत घोषणा केली आहे की चॅम्पियन ट्रॉफी हायब्रीड पद्धतीने खेळवली जाणार आहे. भारतीय संघाचे सर्व चॅम्पियन ट्रॉफीचे सामने पाकिस्तानच्या बाहेर होणार आहेत तर उर्वरित संघाचे सामने पाकिस्तानमध्ये खेळवले जाणार आहेत. १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन ट्रॉफीचा शुभारंभ केला जाणार आहे. परंतु अजुनपर्यत भारतीय संघाची चॅम्पियन ट्रॉफीसाठी घोषणा केली नाही. त्यामुळे टीम इंडियाची घोषणा कधी केली जाणार याची तारीख समोर आली आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर विराट-रोहित या मालिकेत खेळताना दिसणार, बुमराहला मिळणार विश्रांती!
आता चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ सादर करण्याची शेवटची तारीख काय आहे हे या अहवालातून समोर आले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटले आहे की सर्व संघांना १२ जानेवारीपर्यंत १५ सदस्यीय तात्पुरती (जे बदलाच्या अधीन आहे) संघाची घोषणा करावी लागेल. तथापि, संघ १३ फेब्रुवारीपर्यंत त्यांच्या संघात बदल करू शकतात. ही स्पर्धा १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. अहवालात आयसीसीच्या एका सूत्राचा हवाला देत म्हटले आहे की, “सर्व संघांना १२ जानेवारीपर्यंत त्यांची तात्पुरती पथके सादर करावी लागणार आहेत, परंतु १३ फेब्रुवारीपर्यंत बदल केले जाऊ शकतात. ते त्यांच्या संघांची घोषणा करतात की नाही हे संघांवर अवलंबून असेल कारण आयसीसीने ” १३ फेब्रुवारी रोजी सादर केलेले पथक सोडले जाईल.”
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया घरच्या भूमीवर इंग्लंडविरुद्ध पांढऱ्या चेंडूची मालिका खेळणार आहे. या मालिकेत ५ T२० आंतरराष्ट्रीय आणि ३ एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. ही मालिका २२ जानेवारीपासून सुरू होणार आहे. पहिले T२० सामने खेळवले जातील. त्यानंतर ६ फेब्रुवारीपासून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होईल. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाची ही शेवटची एकदिवसीय मालिका असेल, ज्याद्वारे संघ स्पर्धेसाठी तयारी करू शकेल.
भारताच्या संघाने केलेल्या कसोटी सामान्यांमधील कामगिरीमुळे सर्वच क्रिकेट चाहते निराश आहेत. टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका होण्याच्या आधी श्रीलंका दौऱ्यावर एकदिवसीय मालिकेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी टीम इंडियाने निराशाजनक कामगिरी केली होती. त्यामुळे आता इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असणार आहे. भारताच्या संघाला श्रीलंका दौऱ्यावर एकदिवसीय मालिकेमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर सातत्याने टीम इंडियाकडून एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली आहे. आता भारताच्या संघामध्ये कोणते नवे बदल असणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.