फोटो सौजन्य - IndianPremierLeague
आयपीएल 2025 पाॅइंट टेबल : आयपीएल 2025 चे राहिलेले सामने आजपासुन खेळवले जाणार आहेत. सध्या 13 साखळी सामने या स्पर्धेचे खेळवले जाणार आहेत. भारताचा अ संघ 30 मे पासुन इंग्लड दौऱ्यावर असणार आहे. त्यामुळे काही भारताचे खेळाडू हे इंग्लड दौऱ्यावर असणार आहे. 3 जून रोजी आयपीएल 2025 चा फायनलचा सामना खेळवला जाणार आहे. सध्या आयपीएल 2025 च्या गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे गुजरातच्या संघाचे प्लेऑफचे चान्स आहेत. आयपीएल 2025 चे च्या गुणतालिकेची स्थिती काय आहे यासंदर्भात एकदा सविस्तर वाचा.
गुणतालिकेवर नजर टाकली तर, गुजरात टायटन्यचा संघ सध्या पहिल्या स्थानावर आहे. गुजरातचा संघाचे आतापर्यत 11 सामने झाले आहेत. यामध्ये त्यांना 8 सामन्यात विजय मिळाला आहे तर 3 सामन्यात त्याचा पराभव झाला आहे. गुजरातचे सध्या 16 गुण आहेत. राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. बंगळुरूच्या संघाचे सध्या 16 गुण आहेत. तिसऱ्या स्थानावर श्रेयस अय्यरचा पंजाब किग्सचा संघ आहे. सध्या पंजाब किंग्सचे 15 गुण आहेत. पंजाबच्या संघाने विजय मिळवल्यास ते प्लेऑफमध्ये प्रवेश करतील. पंजाबच्या संघाने 7 सामन्यात विजय मिळवला आहे तर 3 सामन्यात त्याचा पराभव झाला आहे. 1 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.
चौथ्या स्थानावर मुंबई इंडीयन्सच्या संघाने आतापर्यत 12 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांना 5 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे तर 7 सामन्यात त्यांना विजय मिळाला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ पाचव्या स्थानावर आहे. दिल्लीच्या संघाला उर्वरित सामने जिंकणे अनिवार्य आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने आतापर्यत 11 सामने खेळले आहेत यामध्ये त्यांना 6 सामन्यात विजय मिळाला आहे तर 4 सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे, सध्या दिल्लीचे 11 गुण आहेत. कोलकता नाइट राईडर्सचा संघ सहाव्या स्थानावर आहे, त्याचे सध्या 11 गुण आहेत.
A lot to play for as the road to playoffs intensifies 🤩
Who can make it to the Top 4⃣? 🤔
🔽 Read to find out 🔗 | #TATAIPL
https://t.co/8FTBbz7f0j pic.twitter.com/ThW6O9VSUC— IndianPremierLeague (@IPL) May 16, 2025
कोलकता नाइट राईडर्सचे पुढील सामने राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनराइझर्स हैदराबाद यांच्याविरूध्द होणार आहे. लखनऊ सुपर जायंट्सचा संघ गुणतालिकेमध्ये सातव्या स्थानावर आहे. लखनऊचा संघ प्लेऑफमध्ये टिकून आहे जर संघाला प्लेऑफमध्ये जायचे असल्यास संघाला राहिलेले सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. सनराइझर्स हैदराबाद, राजस्थान राॅयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ प्लेऑफच्या शर्यतीमधुन बाहेर झाले आहेत.